A section of Estadio Monumental in Chile has collapse esakal
क्रीडा

VIDEO : चिलीत फुटबॉल स्टेडियमच्या स्टँडचा भाग कोसळला चाहत्यांच्या अंगावर

अनिरुद्ध संकपाळ

Estadio Monumental Chile : चिलीत शुक्रवारी फुटबॉल स्टेडियमचा काही भाग चाहत्यांच्या अंगावर कोसळल्याने काही चाहते जखमी झाले. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना चिलीयन फुटबॉल क्लब कोलो कोलोच्या सराव सत्रादरम्यान झाली. यावेळी काही अतीउत्साही चाहते स्टँडला लागून असलेल्या जाहिरातीच्या बोर्डवर चढले होते. त्यामुळेच स्टेडियमच्या छताचा काही भाग कोसळला.

कोलो कोलो क्लबचे फॅन्स स्टेडियमवरील जाहिरातीच्या बोर्डवर चढल्याने इस्ताडियो मोन्यूमेंटलचा काही भाग कोसळला. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता जवळपास 45 हजार इतकी आहे. या स्टेडियमवर सध्या हंगामाचा सुरूवातीचे सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. मात्र काही चाहत्यांच्या अतिउत्साहीपणामुळे ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेत अनेक चाहते जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व चाहते स्टेडियमच्या उद्घाटनाला 33 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एकत्र जमले होते.

दरम्यान, सराव सत्रासाठी आलेलेल्या फुटबॉलपटूंनी या घटनेवर 'लोक प्रोत्साहन देण्यासाठी आले होते. ते सर्व आनंद घेत होते. वैयक्तिकरित्या मला लोकांना हे करू नका असे सांगितले तर राग येतो. ते सहसा चांगले वर्तन करतात. मला वाटते की अशी घटना पुन्हा घडू नये.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू, १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नेमके काय केले बदल?

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीवर मामेभावाकडून अत्याचार

India Exports: भारताच्या निर्यातीत ऐतिहासिक उच्चांक! ८६३ अब्ज डॉलरचे उत्पन्न, सेवा क्षेत्राचे मोठे योगदान, ‘सेवा निर्यात महासत्ता’ सिद्ध

विजय सरकार स्थापन करणार की राष्ट्रपती राजवट? राज्यपालांच्या एका निर्णयाकडे देशाचं लक्ष, आतापर्यंत अशा परिस्थितीत काय घडलं?

Thalapathy Vijay Opposition Leader Tamil Nadu : विजय थलपती मुख्यमंत्री नाही तर विरोधी पक्षनेता होणार?, भाजपकडून करेक्ट कार्यक्रम; तमिळनाडूचा रिमोट कंट्रोल मोदींच्या हाती

SCROLL FOR NEXT