क्रीडा

द.आफ्रिका विश्वचषक जिंकू शकत नाही, दिग्गजानं सांगितलं कारण

नामदेव कुंभार

दक्षिण आफ्रिका संघाला नेहमीच तुल्यबळ आणि बलाढ्य संघ मानलं जातं. पण आतापर्यंत या संघाला एकही विश्वचषक जिंकता आला नाही. दक्षिण आफ्रिका संघाला आतापर्यंत आयसीसीचा एकाही खिताब जिंकता आलेला नाही. आयसीसीचा पुढील टी-20 विश्वचषक भारतात होणार आहे. याआधी भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान आकाश चोप्रानं दक्षिण आफ्रिका संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या युट्युब चॅनलवर आकाश चोप्रानं दक्षिण आफ्रिका संघाची लाज काढली.

दक्षिण आफ्रिका संघात विश्वचषक जिंकण्याचा दम नाही. एबी डिव्हिलिअर्सनं पुन्हा क्रिकेट खेळणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एबी डिव्हिलिअर्स दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, एबी आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार नसल्याचं स्पष्ट केलं. एबीनं संघात पुनरागमन केलं असतं तर दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार होता. मात्र, आता विश्वचषक जिंकण्याचा या संघात दम नाही. एबीसारखा खेळाडू मिळणं कठीण आहे, असं चोप्रा म्हणाला.

दक्षिण आफ्रिका संघा चांगले खेळाडू आहे. पण हा संघ विश्वचषक जिंकू शकतो का? माझ्या मते तर नाही. दक्षिण आफ्रिका विश्वचषक जिंकूच शकत नाही. हा संघ चांगली कामगिरी करु शकतो. इतर संघाच्या प्लॅनवर पाणी फेरु शकतो.मात्र विश्वचषक जिंकू शकत नाही. टी-20 विश्वचषक भारतात होऊ दे नाहीतर युएईमध्ये... परिस्थिती कशीही असो. दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक जिंकू शकत नाही. संपूर्ण स्पर्धेत चांगल कामगिरी करतील मात्र, मोक्याच्या क्षणी ढेपाळतली. या संघाला मोक्याच्या क्षणी पुढे कसं जायचं याबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याबाबात मनात साशंकता आहे, असे चोप्रा म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT