AB De Villiers esakal
क्रीडा

AB De Villiers : तू माझी कारकीर्द संपवलीस! एबी युझवेंद्र चहलला असं का म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

AB De Villiers : आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एबी डिव्हिलियर्स युझवेंद्र चहलबद्दल एका यूट्यूब शोमध्ये बोलत होता. त्यावेळी डिव्हिलियर्स युझवेंद्र चहल तू माझी कारकीर्द संपवलीस असं म्हणाला. युझवेंद्र चहल आणि एबी डिव्हिलियर्स हे दोघे ऑन आणि ऑफ द फिल्ड चांगले मित्र आहेत.

युझवेंद्र चहल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यातील हे संभाषण डिव्हिलियर्सच्या 360 शो या यूट्यूब चॅनलवर झाला. यावेळी डिव्हिलियर्सने 2018 ला भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असतानाचा एक किस्सा सांगितला. यावेळी चहल माझ्यापेक्षा हुशार निघाला असं तो म्हणाला.

डिव्हिलियर्स हासत म्हणाला की, 'मी माझ्या घरच्या मैदानावर सेंच्युरियनवर खेळत होते. मला आठवतं की तो दिवस खूप गरम होता. मी 30 धावांवर खेळत होतो. मला खूप कंटाळा आला होता त्यामुळे काही चौकार मारून धावा करूयात असं वाटलं. मात्र युझवेंद्र चहलने चलाखी दाखवली. तो बुद्धीबळपटू आहे. त्याला लगेच समजलं की मी काय करण्याचा प्रयत्न करतोय.'

'त्याने माझी दांडी गुल केली. मला अजूनही बेल्स उडाल्याचा तो आवाज आठवतो. याबद्दल युझी तुझे आभार मी निवृत्त होण्यामागचं खरं कारण तोच होता.'

डिव्हिलियर्स पुढे म्हणला की, 'जेव्हापासून तू माझी वनडे कारकीर्द संपवली. तू माझ्या कबरीचा शेवटचा खिळा ठोकलास. आता तू म्हण की मी तुझा बनी आहेस.'

युझवेंद्र चहल पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला आहे. भारतीय संघातून अनेक महिन्यांपासून दूर असलेल्या युझवेंद्र चहलची अखेर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली आहे. ही मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT