Actually Are We Need KL Rahul Big Statement Of New Zealand Former Cricketer Scott Styris esakal
क्रीडा

KL Rahul : राहुलची खरंच गरज आहे का? माजी क्रिकेटपटूचे धक्कादायक विधान

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul : भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या कठिण काळातून जात आहे. त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली होती. यातून तो सावरतो न सावरतो तोच त्याला कोरोनाची लागण झाली. आता तो फिट (KL Rahul Fitness) झाला असून आशिया कपमध्ये भारतीय संघात (Team India) पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिसने (Scott Styris) केएल राहुलबद्दल एक धक्कादायक विधान केले. त्याच्या मते राहुलच्या अनुपस्थितीमुळे सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत सारख्या खेळाडूंना चांगली संधी मिळाली. त्यामुळे आता निवडसमिती विचार करत असेल की खरंच आपल्याला केएल राहुलची गरज आहे?

केएल राहुलचे वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी संघात नाव होते. मात्र त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याला दौऱ्यावर जाता आले नाही. दरम्यान, स्कॉट स्टायरिस स्पोर्ट्स 18 या वाहिनीवरील एका कार्यक्रमात म्हणाला, 'खेळाडूंचा एक वेगळा दृष्टीकोण असू शकतो. खेळाडू संघातून बाहेर जाण्यासाठी तयार नसतात. त्यांना दुसऱ्या खेळाडूला संधी द्यायची नसते. मला माहिती आहे की भारतीय क्रिकेट संघात एक वेगळे आणि चांगले कल्चर आहे. त्यामुळे तिथे दुसऱ्या खेळाडूंना संधी देण्याबाबत चांगला दृष्टीकोण आहे. मात्र एक खेळाडू म्हणून सांगतो की तुम्ही कोणालाही तुमची जागा घेण्याची संधी देऊ इच्छित नसता.'

स्टायरिस पुढे म्हणाला 'खरं म्हणजे तो दुखापतीमुळे संघातून बाहेर गेला. तो सध्या संघापासून दूर आहे. याचा अर्थ दुसरे खेळाडू त्याच्यासारखी कामगिरी करू शकतात. सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत चांगली कामगिरी करत आहे. धावा करत आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे निवडसमितीसमोर प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्याला केएल राहुलची गरज आहे? तो परत आल्यानंतर तो चांगल्या फॉर्ममध्ये असेल? केएल राहुल बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. सध्याच्या वास्तवात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण त्यानेच इतर खेळाडूंना संधी दिली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Satara Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; वनधिकाऱ्यांना निलंबित करेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही, नागरिकांचा आक्रमक पवित्रा

16 तास उपवास, रोज 6 KM चालणं; 61 व्या वर्षी निवेदिता 'असा' आहे सराफ फिटनेस मंत्रा? म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : उद्धव-राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT