Afghanistan Defeat Bangladesh  esakal
क्रीडा

Asia Cup 2022 : झादरान जोडीने बांगलादेशला चोपले; अफगाणिस्तान सुपर 4 मध्ये पोहचणारा पहिला संघ

अनिरुद्ध संकपाळ

Bangladesh Defeat Afghanistan 3rd Match Group B : बांगलादेशने ठवलेले 128 धावांचे आव्हान पार करताना अफगाणिस्तानची देखील दमछाक झाली. मात्र अखेर अफगाणिस्तानने हे आव्हान 3 गड्यांच्या मोबदल्यात पार करत आपले ग्रुपमधील दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले. नजीबुल्ला झादरान आणि इब्राहीम झादरान यांनी चौथ्या विकेटसाठी 69 धावांची दमदार भागीदारी रचली. नजीबुल्लाने 17 चेंडूत नाबाद 43 धावांचा तुफानी खेळी केली. तर इब्राहीमने चिवट फलंदाजी कर 41 चेंडूत 42 धावा केल्या. (Najibullah Zadran Ibrahim Zadran Shine)

अफगाणिस्तानचे फलंदाज परिस्थिती कोणतीही असो आक्रमक खेळण्यावर भर देतात. मात्र आजच्या सामन्यात अफगाणिस्तानचे सलामीवीर हजरतुल्ला झजाई आणि रेहमतुल्ला गुरबाज यांनी पॉवर प्लेमध्ये सावध पवित्रा घेत फलंदाजी केली. मात्र ही सावध सुरूवात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने पाचव्या षटकात 15 धावांवर संपवली. त्याने 18 चेंडूत 11 धावा करणाऱ्या रेहमतुल्ला गुरबाजला बाद केले.

यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी आणि सलामीवीर हजरतुल्ला झजाई यांनी संघाला 10 षटकात 45 धावांपर्यंत पोहचवले. मात्र ही भागीदारी मोसादेक हुसैनने तोडली. त्याने 23 धावा करणाऱ्या हजरतुल्लाला बाद केले. यानंतर कर्णधार नबी देखील 8 धावांची भर घालून माघारी परतला.

यानंतर इब्राहीम झरदान आणि नजीबुल्ला झादरान यांनी दमदार फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी 66 धावांची नाबाद भागीदारी रचली. इब्राहीमने 41 चेंडूत 42 धावा केल्या तर नजीबुल्लाने 17 चेंडूत नाबाद 43 धावांची तुफानी खेळी करत अफगाणिस्तानला 19 व्या षटकात विजय मिळवून दिला.

आशिया कप ग्रुप B मधील बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शारजावर होत असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला अफगाणी फिरकीपटूंनी चांगलेच रडवले. मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांच्या फिरकीसमोर बांगलादेशला 20 षटकात 7 बाद 127 धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशकडून मोसादेक हुसैनने 48 धावांची झुंजार खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar: निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् नवजात बाळ तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं,...घटनेनं संताप

Hockey Jersey Controversy: हॉकी संघाच्या भगव्या जर्सीवरून वाद पेटला, अध्यक्षांना अंधारात ठेवून निर्णय घेतला... Email ने उडवली खळबळ; नेमका वाद काय?

'आम्ही एकत्र जेवतो, गप्पा मारतो...' 'सनई चौघडे'मुळे पुन्हा भेटल्या कॉलेजच्या मैत्रिणी; मेघना एरंडेचा खास खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : आईसह दोन लेकींचे मृतदेह सापडले; रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेला दुःखद पूर्णविराम

Valti Bridge Danger: ४० वर्षांपूर्वीचा वळती-मांगीरबाबा पुल वाहतुकीसाठी धोकादायक

SCROLL FOR NEXT