क्रीडा

Pak vs Afg: सामन्यादरम्यान अफगाणिस्तान अन् पाकिस्तानच्या चाहत्यांचे भांडण! स्टेडियममध्ये गदारोळ Video Viral

Kiran Mahanavar

Afghanistan vs Pakistan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात स्टेडियममध्ये गदारोळ झाला. चाहत्यांमधील वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा वनडे खेळला जात असताना दोन चाहत्यांचे भांडण झाले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, सामना पाहण्यासाठी आलेल्या श्रीलंकन ​​क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ संघाचे झेंडे आणि टोप्या परिधान केल्या होत्या. त्याचवेळी एक अफगाण समर्थकही हातात देशाचा झेंडा घेऊन त्या श्रीलंकन ​​क्रिकेट क्रिकेट चाहत्याला काहीतरी बोलताना दिसत आहे. काही काळ दोघांमध्ये वाद झाला, मात्र त्यानंतर प्रकरण शांत झाले.

ही काही पहिली वेळ नाही, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली होती. गेल्या आशिया कपमध्येही स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता.

तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 59 धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानी संघाने मालिका 3-0 ने जिंकली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 268 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतकी खेळी केली.

प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचे फलंदाज आपल्या लयीत दिसले नाहीत. खालच्या फळीत मुजीब उर रहमानने संघाला सावरण्याचा प्रयत्न नक्कीच केला असला तरी त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. अफगाणिस्तानसाठी मुजीबने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

एकदिवसीय क्रिकेटमधील अफगाणिस्तानसाठी हे सर्वात जलद अर्धशतक आहे. 37 चेंडूत 64 धावा करून मुजीब बाद झाला. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 5 षटकारही लगावले. अशाप्रकारे लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 48.4 षटकांत 209 धावांवर गारद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT