AFG vs SL ESAKAL
क्रीडा

AFG vs SL : चिंताजनक घटना; श्रीलंकेच्या राष्ट्रगीतावेळी खेळाडूंचे लक्ष झाले विचलित, उभा असलेला बॉल बॉय...

अनिरुद्ध संकपाळ

AFG vs SL : वर्ल्डकप 2023 मध्ये आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळवला जात आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ऑक्टोबर महिन्यात भर दुपारी होत असलेल्या या सामन्यावेळी एक चिंताजनक घटना घडली. नाणेफेकीनंतर दोन्ही संघ आपल्या राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. दरम्यान, श्रीलंकेच्या राष्ट्रगीतावेळी असं काही घडलं की सर्व खेळाडूंचं लक्ष एका बॉल बाॉयकडे गेलं.

सामना सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडू बॉल बॉयसोबत राष्ट्रगीत म्हणण्यासाठी मैदानावर आले. नेहमीप्रमाणे लहान मुलं राष्ट्रगीतासाठी खेळाडूंच्या पुढे उभे राहिली होती. श्रीलंकेचे राष्ट्रगीत हे 2 मिनिट 30 सेकंदाचं आहे. हे राष्ट्रगीत सुरू असतानाच कुशल मेंडीसला जाणीव झाली की त्याच्या समोर उभा असलेल्या मुलाची तब्येत बिघडत आहे.

त्याने त्वरित मुलाला पकडले. तोपर्यंत त्या मुलाला चक्कर आली होती. तो उभा देखील राहू शकत नव्हता. त्यावेळी अफगाणिस्तानची जर्सी घातलेला एक व्यक्ती आला आणि तो मुलाला घेऊन गेला.

दोन्ही संघासाठी सामना महत्वाचा

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. दोन्ही संघांनी दोन सामने जिंकले असून ते अजूनही सेमी फायनल गाठण्याच्या शर्यतीत आहेत. त्यांना सेमी फायनल गाठण्यासाठी आपले सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तसेच दुसऱ्या सामन्याच्या निकालावर देखील अवलंबून रहावे लागणार आहे. आज एका संघाची आशा जिवंत राहील तर एकाची आशा संपुष्टात येणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT