IND vs ENG 2nd Test esakal
क्रीडा

IND vs ENG 2nd Test : पतौडी-कुंदरननंतर... यशस्वी अन् गिलनं केली 60 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG 2nd Test : भारताने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हान ठेवले आहे. तिसऱ्या दिवशीचा हिरो ठरला तो शुभमन गिल! तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या शुभमन गिलने 104 धावांची शतकी खेळी करत भारताला दुसऱ्या डावात भक्कम स्थितीत पोहचवले. गिलचे हे तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पहिले शतक आहे.

सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने द्विशत ठोकले होते. त्याने 209 धावा करत संघाला 396 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताकडून यशस्वी जैस्वालने द्विशतक तर शुभमन गिलने शतक ठोकले. दोघेही फलंदाज हे 25 वर्षाच्या आतले आहेत. त्यांनी 1964 नंतर इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

भारताकडून 25 वर्षाच्या आतील दोन फलंदाजांनी एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक ठकोण्याचा पराक्रम यापूर्वी मनसूर अली खान पतौडी आणि बुधी कुंदरन यांनी केला होता. त्याने 1964 मध्ये अशी कमागिरी केली होती. पतौडींनी नाबाद 203 धावा केल्या होत्या तर कुंदरन यांनी 100 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता 2024 मध्ये यशस्वी जैस्वालने 209 तर शुभमन गिलने 104 धावा केल्या.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही भारताने चांगली कामगिरी केली. भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 253 धावांवर रोखले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या. अक्षरने 76 धावांची खेळी करणाऱ्या झॅक क्राऊलीला बाद करत एकमेव मात्र महत्वाची विकेट घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT