After Ben Stokes Retirement Kevin Pietersen Take A Dig On England Cricket Board ESAKAL
क्रीडा

'मी ODI मधून निवृत्ती घेतली त्यांनी T20 मधून बॅन केलं'

अनिरुद्ध संकपाळ

Ben Stokes : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने निवृत्तीची (Retirement) घोषणा करताना स्पष्टपणे सांगितले की 'क्रिकेटचे तीनही फॉरमॅट खेळणे हे माझ्यादृष्टीने कठिण आहेत. मला असं फक्त वाटत नाही तर माझं शरीरही आता साथ देत नाहीये. याचबरोबर मला असे वाटते की मी एका दुसऱ्या खेळाडूची जागा आडवत आहे. तो खेळाडू जॉस बटलरला आणि उरलेल्या संघाला आपले शंभर टक्के देईल. आता दुसऱ्या कोणीतरी प्रगती करण्याची गरज आहे.'

दरम्यान, स्टोक्सच्या निवृत्तीनंतर क्रिकेट वर्तुळात अतिक्रिकेटची चर्चा सुरू झाली. या चर्चेत आता इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने (Kevin Pietersen) उडी घेतली. त्याने ट्विट करून इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (England Cricket Board) एक प्रकारे चिमटाच काढला. पिटरसनने ट्विट केले की, 'मी एकदा क्रिकेटचे वेळापत्रक हे तापदायक आहे मी त्याच्याशी जुळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे मी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मला टी 20 मधून देखील बॅन केले.'

केविन पिटरसनचे इंग्लंड क्रिकेट बोर्डासोबत कधी चांगले तर कधी वाईट संबंध राहिले आहेत. पिटरसन हा इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज होता. पिटरसनने 104 कसोटी, 136 वनडे आणि 37 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 8,181 धावा, वनडेत 4,440 आणि टी 20 मध्ये 1,176 धावा केल्या आहेत. तो काही आयपीएल हंगामात देखील खेळला आहे.

दुसरीकडे स्टोक्सच्या या निर्णयावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी द्विपक्षीय मालिका आणि फ्रेंचायजी क्रिकेट एकाचवेळी खेळले जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. वॉनने, 'जर सर्व क्रिकेट बोर्ड त्यांच्या त्यांच्या फ्रेंचायजी क्रिकेटसाठी आग्रही राहिले तर द्विपक्षीय वनडे, टी 20 मालिकांना तिलांजलीच द्यावी लागेल. वयाच्या 31 व्या वर्षी एखादा खेळाडू एका क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतोय हे चांगले नाही.' असे ट्विट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT