Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane out Shreyas Iyer trends esakal
क्रीडा

'एक बार मौका दिजीये, प्राउड फील होंगे आप'

पुजारा - रहाणे बाद झाल्यावर श्रेयस अय्यर आला ट्रेंडिंवर

अनिरुद्ध संकपाळ

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या संघातील वरिष्ठ फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या दोघांनी दुसऱ्या कसोटीत थोड्याफार धावा करुन सगळ्यांनाच आशेला लावले होते. मात्र तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच या दोघांनी पुन्हा हाराकिरी केली. यानंतर सोशल मीडियावर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) लगेच ट्रेंड करु लागला. नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स पोस्ट करत आता तरी श्रेयस अय्यरला संधी द्या अशी मागणी केली. एका नेटकऱ्याने तर मिर्झापूरमधील एका सीनचे मीम शेअर करत अय्यरला संधी देण्याची मागणी केली. (Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane out Shreyas Iyer trends)

तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारत २ बाद ५८ धावांवर होता. विराट कोहली (Virat Kohli) १४ तर चेतेश्वर पुजारा ९ धावा करुन नाबाद होते. हे दोघे तिसऱ्या दिवशी भारताला मजबूत आघाडी मिळवून देतीत अशी आशा होती. मात्र तिसऱ्या दिवसाची सुरुवात पुजाराच्या (Cheteshwar Pujara) विकेटने झाली. त्या पाठोपाठ अजिंक्य रहाणेही आपले खाते उघडून माघारी परतला. या दोघांसाठी दक्षिण आफ्रिका दौरा हा शेवटची संधी असेल असे संकेत देण्यात आले होते.

मात्र या दोघांनाही या संधीचे सोने करता आलेले नाही. मोक्याच्या क्षणी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने कच खालला. त्यामुळे सोशल मीडियावर आता यांच्या जारी श्रेयस अय्यर सारख्या तरुण खेळाडूला संधी द्यावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे रहाणे आणि पुजारा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर ट्रेंडिंगवर (Shreyas Iyer Trending) आला. श्रेयस अय्यरने न्यूझीलंड विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत पहिल्या डावात १०५ धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने ६५ धावांची अर्धशतकी खेळी करुन संघासाठी मोलाचे योगदान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT