India Lost Semi Final Punters Lose Rupees 500 Cr esakal
क्रीडा

IND vs ENG : अॅडलेडवर भारत हरला अन् 500 कोटींचा चुराडा झाला

अनिरुद्ध संकपाळ

India Lost Semi Final Punters Lose Rupees 500 Cr : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने सेमी फायनलमध्ये धडक मारल्यानंतर आता वर्ल्डकप दूर नाही अशीच सर्व क्रिकेटप्रेमींची भावना होती. मात्र सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा तब्बल 10 विकेट्सनी पराभव करत सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे हिरमोड केला. मात्र या इंग्लंडने फक्त भारतीय क्रिकेट चाहत्यांचेच ह्रदय तोडले नाही तर सट्टेबाजांच्याही पैशाचा चुराडा करून टाकला. मिळालेल्या माहितीनुसार रोहितच्या विश्वासावर टीम इंडियावर पैसे लावणाऱ्या सट्टेबाजांना तब्बल 500 कोटी रूपयांचा फटका बसला आहे.

अहमदाबाद मिररच्या एका वृत्तानुसार सट्टेबाजांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात 13 व्या षटकापासून सट्टा लावणे बंद केले होते. यावेळी इंग्लंडने बिनबाद 140 धावा ठोकल्या होत्या. ज्यावेळी सामना सुरू झाला त्यावेळी इंग्लंड हा सामना जिंकण्याची प्रबळ दावेदार नव्हती. सामन्यापूर्वी भारतावर 82 पैसे तर इंग्लंडवर 1.10 रुपये सट्टा लागला होता. मात्र 13 व्या षटकात सट्टेबाजीच्या बाजारात भारत 15 रूपये तर इंग्लंड 1 पैशावर होती.

याबाबत बोलताना एका सट्टेबाजाने सांगितले की, इंग्लंड सुरूवातीपासून चांगली खेळत असून देखील सर्वांनीच 11 व्या षटकापर्यंत भारत पुनरागमन करेल या आशेवर भारतावर पैसे लावले. दरम्यान, 5 लाख रूपये गमावणाऱ्या एका सट्टेबाजाने सांगितले की, 'आम्ही सर्व काही गमवून बसलो. कारण 13 व्या षटकानंतर सट्टेबाज उलटा दाव लावत होते.

सूत्रांनी सांगितले की सट्टेबाज सुरूवातीपासूनच भारतावर दाव लावलत होते. मात्र इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यानंतर पुढे पुढे सट्टेबाजांनी सट्टा लावणेच बंद केले. या सूत्राने सांगितले की त्यांच्यासाठी हा टी 20 सामना हा सर्वात खराब टी 20 सामना होता. सगळ्यांप्रमाणे हे देखील भारत - पाकिस्तान टी 20 फायनलवर दाव लावत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT