Virat Kohli And Pant Sakal
क्रीडा

आता कसोटीत पंतला कॅप्टन करा; दिग्गजाचा सल्ला

सुशांत जाधव

भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व कोहलीनंतर कुणाकडे जाणार? याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यातील मालिकेनंतर विराट कोहलीनं तडकाफडकी संघाचे नेतृत्व सोडल्याची घोषणा केली. विराट कोहलीनंतर (Virat Kohli) सध्याच्या घडीला कसोटी संघाचा उप-कर्णधार असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) कायमचा टेस्ट कॅप्टन होणार की बीसीसीआय निवड समिती नव्या नावाचा विचार करणार याविषयची चर्चा रंगताना दिसत आहे. (Rishabh Pant as the next India captain)

भारतीय संघाचे (Team India) माजी कर्णधार आणि फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी युवा रिषभ पंतच्या (Rishabh Pant) खांद्यावर ही जबाबदारी द्यायला हवी, असे मत व्यक्त केले आहे. जबाबदारी आल्यानंतर तिन्ही प्रकारात पंतची कामगिरी उंचावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गावसकर एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतमध्ये म्हणाले की, "भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाचा विचार करताना मोठा वादविवाद रंगणार आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य कोणाच्या हाती द्यावे याची निवड करणं सोप नाही. यात पहिली महत्त्वाची गोष्टी ही आहे की ज्या खेळाडूची निवड केली जाईल तो तिन्ही क्रिकेट प्रकारात संघाचा सदस्य असेल. ही गोष्ट फिक्स केली तर सिलेक्शन सोपे होऊन जाईल."

ते पुढे म्हणाले, "जर तुम्ही मला विचाराल तर मी रिषभ पंतची निवड करेन. रिकी पाँटिंगला पदावरुन हटवल्यानंतर रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचे कॅप्टन करण्यात आले. त्यानंतर रोहित शर्माची फलंदाजीत आणखी सुधारणा झाली. अचानक कॅप्टन झाल्यावर जो रोहित 30, 40 आणि 50 धावा करायचा त्याच्या भात्यातून शतक, 150 धावा आणि 200 धावा निघाल्याचे आपण पाहिले." जर पंतकडे कसोटी संघाची जबाबदारी दिली तर तो न्यूलँड्सच्या मैदानातील खेळी प्रमाणे बहरदार खेळी करेल.

यावेळी गावसकरांनी मन्सू अली खान पतौडी यांचा दाखलाही दिला. त्यांनी कमी वयात कर्णधारपद मिळाल्यामुळे यश मिळवले होते, असे ते म्हणाले. टायगर पतौडी यांच्याकडे वयाच्या 21 व्या वर्षात विपरित परिस्थितीत कर्णधारपद देण्यात आले. त्यांनी निर्णय सार्थ ठरवला होता. पंतने आयपीएलमध्ये आपल्याला नेतृत्वाची झलक दाखवून दिली आहे, याची आठवणही गावसकरांनी यावेळी करुन दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: विरार ते मरीन ड्राइव्ह आता नॉन-स्टॉप! सी लिंक प्रकल्पाला 'पर्यावरण'ची अंतिम मंजुरी

Female Doctor Case: पीएसआय आणि अन्य आरोपीनं महिला डॉक्टरचा छळ का केला? पीडितेच्या भावानं खरं कारणच सांगितलं, वाचा इनसाईड स्टोरी...

23 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं गंभीर आजारामुळे निधन; सिनेविश्वावर शोककळा

Mumbai News: रोजंदारी कामगारांची दिवाळी अंधारात! आरोग्य विभागाकडून बोनसचा प्रस्ताव रखडला

Weekly Horoscope 27 October to 2 November: हंस राजयोग कर्क राशीसह 5 राशींचे भाग्य उजळेल, अपूर्ण इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT