Pakistan Vs Zimbabwe esakal
क्रीडा

PAK vs ZIM : झिम्बाब्वेने पॉवर प्लेमध्ये पाकचे वाढवले होते टेन्शन मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Pakistan Vs Zimbabwe : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये आज पर्थवर पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात झिम्बाब्वेने 20 षटकात 8 बाद 130 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेने पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरूवात करत पाकिस्तानचे टेन्शन वाढवले होते. मात्र मोहम्मद वसिम आणि शादाब खान यांनी चांगला मारा करत झिम्बाब्वेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. वसिमने 24 धावात 4 तर शादाब खानने 23 धावात 3 विकेट्स घेतल्या. झिम्बाब्वेकडून सेआन विलियम्सने सर्वाधिक 31 धावा केल्या.

सलामीवीर माधवेरे आणि कर्णधार क्रेग एर्विन 5 षटकात 42 धावा चोपून पाकिस्तानची हवा टाईट केली होती. पाकिस्तानची देखील इंग्लंडसारखी अवस्था होते का असे वाटत असतानाच पाकिस्तानच्या मदतीला हारिस रौऊफ धावून आला. त्याने कर्णधार क्रेगला 19 धावांवर बाद करत झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. पाठोपाठ मोहम्मद वसिमने माधवेरेला 17 धावांवर बाद करत झिम्बाब्वेची अवस्था 2 बाद 43 अशी केली. यानंतर लेग स्पिनर शादाब खानने झिम्बाब्वेला तीन धक्के देत त्यांची अवस्था 5 बाद 95 धावा अशी केली. दरम्यान, वसिमने झिम्बाब्वेच्या बॅटिंगचा कणा असलेल्या सिकंदर रझाला 9 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याच षटकात वसिमने जाँगवेला शुन्यावर बाद करत आपला तिसरा मोहरा टिपला.

अखेर रेयान बर्ल आणि ब्रॅड एव्हान्स यांनी आठव्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी रचत संघाला 126 धावांपर्यंत पोहचवले. ही जोडी देखील वसिमने फोडली. त्याने एव्हान्सला 19 धावांवर बाद केले. दरम्यान नगारव्हा आणि बर्ल यांनी झिम्बाब्वेला 20 षटकात 130 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT