Against Sandeep Patil conflict of interest complaint was filed esakal
क्रीडा

Sandeep Patil : MCA अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरताच संदीप पाटलांविरूद्ध तक्रार दाखल

अनिरुद्ध संकपाळ

Sandeep Patil MCA President Election : भारताचे माजी फलंदाज आणि प्रशिक्षक संदीप पाटील यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर काही तासातच धक्का बसला आहे. त्यांच्याविरूद्ध हितसंबंधाबाबत संघर्षाच्या मुद्द्यावरून तक्रार दाखील झाली आहे. संदीप पाटील आणि मुंबईचे निवडसमिती प्रमुख सलिल अंकोला यांच्यातील नात्यावरून ही तक्रार दाखल झाली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव संजय नाईक यांनी ही तक्रार दाखल केली असून आपल्या तक्रारीत त्यांनी 'संदीप पाटील हे एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. त्यांना एमसीएसच्या घटनेतील कलम 38(व) नुसार अपात्र ठरवण्यात यावे.' अशी मागणी केली आहे.

नाईक आपल्या 13 पानी तक्रारीत म्हणतात की, 'संदीप पाटील यांची सून सना पाटील ही सलील अंकोला यांची मुलगी आहे. सलील अंकोला सध्या मुंबईच्या वरिष्ठ संघ निवडसमितीचे चेअरमन आहेत. सलिल अंकोला यांची मुलगी ही संदीप पाटील यांची सून आहे त्यामुळे संदीप पाटील आणि अंकोला यांचे नातेसंबंध हे जवळचे येतात. हा एमसीए घटनेच्या 38 (व) नियमाअंतर्गत कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट (हितसंबंधाबाबत संघर्ष) मुद्दा येतो.'

नाईक यांनी आपले ही 13 पानी तक्रार लोकपाल दिलीप भोसले यांच्याकडे केली आहे. संदीप पाटील यांनी भारताकडून 29 कसोटी 45 वनडे सामने खेळले आहेत. ते भारताच्या 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य देखील होते. संदीप पाटील यांनी शरद पवार गटाकडून एमसीएच्या अध्यक्षपदासाठी आपले नामांकन भरले आहे. संदीप पाटील यांची लढत ही मुंबईतील आमदार आशिष शेलार यांच्याविरूद्ध होण्याची शक्यता आहे. शेलार शरद पवार पॅनलविरूद्ध आपले स्वतःचे पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहेत. एमसीएची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार आहे. ही लढत शेलार आणि पवार यांच्या गटात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT