cricket sakal
क्रीडा

अंकित बावणेचे आक्रमक दीड शतक ; महाराष्ट्राला मणिपूरविरुद्ध विजयाची संधी

केदार जाधव आणि सिद्धेश वीर यांच्या अर्धशतकाच्या योगदानामुळे महाराष्ट्राने त्रिशतकी धावा करून मणिपूर संघावरचे वर्चस्व दुसऱ्या दिवशी कायम राखले. महाराष्ट्राने पहिल्या डावात १८३ धावांनी आघाडी घेतली आणि आज दुसऱ्या दिवसअखेर मणिपूरची ४ बाद ८५ अशी अवस्था केली. मणिपूरचा संघ अजून ९८ धावांनी पिछाडीवर आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अंकित बावणेने यंदाच्या रणजी मोसमात महाराष्ट्राकडून पहिले शतक करण्याचा मान मिळवला. केदार जाधव आणि सिद्धेश वीर यांच्या अर्धशतकाच्या योगदानामुळे महाराष्ट्राने त्रिशतकी धावा करून मणिपूर संघावरचे वर्चस्व दुसऱ्या दिवशी कायम राखले. महाराष्ट्राने पहिल्या डावात १८३ धावांनी आघाडी घेतली आणि आज दुसऱ्या दिवसअखेर मणिपूरची ४ बाद ८५ अशी अवस्था केली. मणिपूरचा संघ अजून ९८ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे चार दिवसांचा हा सामना उद्या तिसऱ्या दिवशीच जिंकण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे.

आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ अंकित बावणेसह गोलंदाज हितेश वाळूंज यांनी गाजवला. अंकितने १५३ धावांची खेळी केली, तर पहिल्या डावाच पाच विकेट मिळवणाऱ्या हितेशने तीन फलंदाज बाद केले. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा कर्णधार केदार जाधव ४९ धावांवर नाबाद होता. अर्धशतक केल्यानंतर केदार फार काळ टिकला नाही; पण अंकितने मात्र वेगवान दीडशतकी खेळी करून मैदान गाजवले.

१७२ चेंडू तो मैदानात होता. त्यात त्याने १८ चौकार आणि ६ षटकारांची पेरणी केली. दहाव्या क्रमांकाचा फलंदाज हितेश बाद झाला, तेव्हा महाराष्ट्राची ९ बाद २५० अशी स्थिती होती; परंतु अंकितने एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत महाराष्ट्राची धावसंख्या पटापट वाढवली आणि अखेरचा फलंदाज प्रदीप दाधेसह ७० धावांची भागीदारी केली. यात दाधेचा वाटा केवळ ३ धावांचाच होता.

संक्षिप्त धावफलक ः मणिपूर, पहिला डाव ः १३७ आणि दुसरा डाव ः ४ बाद ८५ (नीतेश सरदेसाई २६, जॉन्सन सिंग २३, हितेश वाळूंज १७-९-२१-३, विकी ओस्तवाल ११-३-३०-१). महाराष्ट्र, पहिला डाव ः ३२० (सिद्धेश वीर ५८, केदार जाधव ५६, अंकित बावणे १५३, विश्वोर्जित कोंथूजाम २३-६-७७-४, एल कृष्णा सिंघा २५-३-११६-३, लंबाम सिंग ९-०-३६-२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT