Ajay Singh  sakal
क्रीडा

CWG 2022 Ajay Singh: वेटलिफ्टर अजय सिंहचे कांस्य पदक अवघ्या एक किलोने हुकले

पाचव्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे पदक हुकले

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 Birmingham : भारताच्या अजय सिंहने (Ajay Singh) वेटलिफ्टिंगमध्ये 81 किलो वजनी गटात पदक हुकले आहे. अजय सिंहने जर पदक जिंकले असते तर भारताला वेटलिफ्टिंगमधील 7 वे पदक जिंकले असते. सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंता शिउली यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत. आता हरजिंदर कौर यांच्याकडून पदकाची आशा आहे.

अजय सिंगने स्नॅच प्रकारात पहिल्याच प्रयत्नात 137 किलो वजन यशस्वीरित्या उचलले. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 140 किलो वजन उचलून पदकाच्या शर्यतीत आपली प्रबळ दावेदारी सादर केली. त्यानंतर त्याने तिसऱ्या प्रयत्न 143 किलो वजन उचलून आपली पदकाची शक्यता अजून बळकट केली. स्नॅच प्रकारात इंग्लंडच्या ख्रिस मुरीने 144 किलो वजन उचलून अव्वल स्थान पटकावले तर ऑस्ट्रेलियाचा कायल ब्रुस 143 किलो आणि भारताचा अजय सिंह 143 किलो वजन उचलून संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर राहिले. तर 140 किलो वजन उचलून कॅनडाचा निकोलस वॅकहोन तिसाऱ्या स्थानावर होता.

क्लीन अँड जर्क प्रकारात अजय सिंहने पहिल्या प्रयत्नात 172 किलो वजन उचलत एकूण 315 किलो वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 176 किलो वजन उचलून एकूण उचलले वजन 319 किलो पर्यंत नेले. मात्र इंग्लंडच्या मुरीने 178 किलो वजन उचलून आपली आघाडी कायम ठेवली. अजय दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मुरीने 181 किलो वजन उचलून गेम रेकॉर्ड तयार केले. याचबरोबर सुवर्णावर देखील मोहर उंमटवली. मात्र तिसऱ्या प्रयत्नात अजय सिंहला तिसऱ्या प्रयत्नात 180 किलो वजन उचलण्यात अपयश आले. तो पदकाच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर राहिला. त्याचे कांस्य पदक अवघ्या एक किलोने हुकले.

सुवर्ण पदक विजेत्या ख्रिस मुरीने एकूण 325 किलो वजन उचलून गेम रेकॉर्ड केले. तर कांस्य पदक जिंकणाऱ्या कॅनडाच्या निकोलस वॅकहोनने एकूण 320 किले वजन उचलले. अजय सिंहने एकूण 319 किलो वजन उचलले होते. त्यामुळे अजय सिंहचे कांस्य पदक अवघ्या एका किलोने हुकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT