Ajinkya Rahane esakal
क्रीडा

Ajinkya Rahane : रहाणे - पुजारासाठी भारतीय संघाची दारे झाली कायमची बंद?

अनिरुद्ध संकपाळ

Ajinkya Rahane : बीसीसीआयने आज दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी 20 आणि कसोटी संघाची घोषणा केली. कसोटी संघात बीसीसीआयने नव्या जुन्यांचा सरमिसळ केली आहे. मात्र यावेळी तरूण खेळाडूंना झुकतं माप देत आपण आता भविष्याकडे पाहत असल्याचे निवडसमितीने संकेत दिले.

भारताचे दोन दिग्गज कसोटी खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. उलट यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यरवर निवडसमितीने विश्वास दर्शवला आहे.

यामुळे आधीच वनडे आणि टी 20 मधून इतिहास जमा झालेले अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आता कसोटीत देखील साईडलाईन झाले आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय कसोटी संघात रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैसवाल आणि ऋतुराज गायकवाड अशा चार सलामीवीरांची निवड करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही कसोटी सामन्यांपासून शुभमन गिल हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्याला संघ व्यवस्थापन चेतेश्वर पुजाराचा वारसदार म्हणून तयार करत आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत डावखुरा यशस्वी जैसवाल हा संघाची पहिली पसंती असणार आहे. तर ऋतुराज सध्या तरी बॅकअप म्हणूनच राहील.

दुसऱ्या बाजूला मधल्या फळीत श्रेयस अय्यरने वनडे वर्ल्डकपमध्ये आपला फॉर्म आणि क्लास दोन्ही सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे त्याचे कसोटीत पुनरागमन होणं निश्चितच होतं. मात्र त्याच्या संघातील पुनरागमनाने अजिंक्य रहाणेसाठी भारतीय कसोटी संघाचे दार कायमचे बंद होण्याची शक्यता आहे.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणारा भारतीय कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी (फिट असेल तर), जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT