ajinkya rahane comeback in indian test team  rahane ipl 2023 csk run stats credits to ms dhoni
ajinkya rahane comeback in indian test team rahane ipl 2023 csk run stats credits to ms dhoni  
क्रीडा

Team India : धोनीने बदलली कारकीर्द अन् रहाणेसाठी उघडलं टीम इंडियाचं दार

रोहित कणसे

अजिंक्य रहाणे तब्बल 15 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघात रहाणेचा समावेश करण्यात आला आहे. खराब फॉर्ममुळे जानेवारी 2022 मध्ये टीम इंडियातून वगळण्यात आलेल्या या अनुभवी फलंदाजाला रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी बक्षीस मिळालं आहे. रहाणेच्या पुनरागमनात भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा हात आहे. (Ajinkya Rahane comeback in indian test team)

रहाणे जेव्हा अंतरराष्ट्रीय टीममधून बाहेर झाला तेव्हा त्याच्यावर प्रचंड दबाव होता. आयपीएल 2022 मधील त्याची कामगिरीही निराशाजनक होती. त्यानंतर रहाणेलाही कोलकाता नाईट रायडर्सने संघातून वगळले. आयपीएलमध्ये त्याने आपली मूळ किंमत कमी केली आणि 50 लाखांच्या गटात आपला समावेश केला. गेल्या वेळी आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला तेव्हा चेन्नई सुपर किंग्जने रहाणेवर बोली लावली नाही. सीएसकेने त्याला 50 लाख रुपयांना खरेदी केले.Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हेही वाचा - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजा

धोनीने रहाणेवर विश्वास ठेवला

चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील असाच एक संघ आहे जो नेहमीच अनुभवी खेळाडूंना संधी देतो. शेन वॉटसन कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असताना चेन्नईने त्याला विकत घेतले. आयपीएलमध्ये जेव्हा कोणताही संघ रॉबिन उथप्पाला विकत घेऊ इच्छित नव्हता, तेव्हा चेन्नईने त्याचा समावेश केला.

याच यादीत रहाणेचाही समावेश झाला. महेंद्रसिंग धोनीला युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण हवे असते. त्याने रहाणेला संधी दिली. माहीच्या कर्णधारपदाखाली मुंबईचा हा खेळाडू दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला आहे. धोनीला त्याची ताकद आणि कमकुवतपणा माहीत होता.

अन् रहाणे चमकला...

रहाणेने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये दोन शतकांच्या मदतीने 57.63 च्या सरासरीने 634 धावा केल्या. मात्र, त्याचा संघ बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. यानंतर तो चेन्नई सुपरकिंग्समध्ये पोहोचला. तेथे धोनीशिवाय प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीने रहाणेच्या फलंदाजीवर काम केले.

चेन्नईने दोन सामन्यांनंतर रहाणेचा संघात समावेश केला. रहाणेने मुंबई इंडियन्सविरुद्ध 61 धावांची धडाकेबाज खेळी केल्यानंतर पुनरागमनाची घोषणा केली. त्यानंतर त्याने 31, 37, नऊ आणि नाबाद 71 धावांची खेळी खेळली. त्याच्या पाच डावात 52.25 च्या सरासरीने 209 धावा आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 199.04 आहे. रहाणेने पुनरागमनाचे श्रेय कर्णधार धोनीला दिले.

रहाणे धोनीबद्दल काय म्हणाला?

रहाणे म्हणाला, माझ्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट म्हणजे मला खेळण्याची संधी मिळत आहे. चेन्नईने मला निवडले तेव्हा मला खूप आनंद झाला. त्यांनी मला खेळण्याची आणि माझी क्षमता दाखवण्याची संधी दिली. धोनीला श्रेय देताना रहाणे म्हणाला की, मला फक्त एका संधीची होती. रहाणे म्हणाला, जेव्हा तुम्ही माही भाई (महेंद्रसिंग धोनी) यांच्या नेतृत्वाखाली खेळता तेव्हा तुम्हाला खूप काही शिकण्याची संधी मिळते. एक फलंदाज आणि क्रिकेटर म्हणून तुम्ही नेहमीच शिकू इच्छिता.

रहाणेने 82 कसोटी खेळल्याl

अजिंक्य रहाणेने भारतासाठी शेवटची कसोटी 11 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. त्या सामन्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्याने भारतासाठी 82 कसोटी सामन्यांमध्ये 38.52 च्या सरासरीने 4932 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 12 शतके आणि 25 अर्धशतके झळकली आहेत. भारताचे अनेक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेल्या रहाणेचे 15 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB : आरसीबीच्या गोलंदाजांनी सामना आणला खेचून, प्ले ऑफच्या आशा ठेवल्या जिवंत

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT