WI vs IND Ajinkya Rahane Vice Captain esakal
क्रीडा

Ajinkya Rahane WI vs IND : एकच फाईट वातावरण टाईट; कसोटी संघाला मिळणार मराठमोळा कर्णधार?

अनिरुद्ध संकपाळ

WI vs IND Ajinkya Rahane Vice Captain : वेस्ट इंडीज दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी नुकतेच भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात निवडसमितीने काही युवा खेळाडूंना संधी देत भविष्याच्या दृष्टीकोणातून भारतीय कसोटी संघाची बांधणी सुरू केली आहे. निवडसमितीने चेतेश्वर पुजाराला संघातून डच्चू दिला तर सशस्वी जैसवाल आणि ऋतुराज गायकवाडला संधी दिली.

विशेष म्हणजे या संघाच्या नेतृत्वात एक मोठा बदल झाला आहे. रोहित शर्माच वेस्ट इंडीजमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करत असला तरी संघाचा उपकर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेची निवड करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेला 18 महिन्यापूर्वी संघातील स्थान आणि उपकर्णधारपदही गमवावे लागले होते. मात्र अजिंक्यने WTC Final मध्ये दोन्ही डावात दमदार फलंदाजी करत आपले पुनरागमन दणक्यात साजरे केले.

आता भारतीय संघाचे उपकर्णधार पदही त्याला परत मिळाले आहे. रोहित शर्मानंतर भारतीय संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावेळी काही युवा खेळाडूंसोबत अजिंक्य रहाणेचे नावही चर्चेत आले होते. आता उपकर्णधारपद परत मिळाल्यानंतर अजिंक्यची कर्णधारपदावरील दावेदारी देखील प्रबळ झाली आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यावरील भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैसवाल, अजिंक्य रहाणे, केएस भरत, इशान किशन, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT