ajinkya rahane saliva-on-hands-break-icc-rules-wtc-final oval-ind vs-aus-video 
क्रीडा

WTC Final : ICCचा हा नियम मोडल्याचा रहाणेवर आरोप, लाइव्ह मॅचमधील क्रिकेटरच्या 'या' कृत्याने उडाली खळबळ

Kiran Mahanavar

WTC Final 2023 Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमावून 327 धावा केल्या आहेत. सध्या ट्रॅव्हिस हेड 156 चेंडूत 146 आणि स्टीव्ह स्मिथ 227 चेंडूत 95 धावांवर नाबाद आहे.

पहिल्या दिवशी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणेवर मैदानावर केलेल्या कृतीमुळे गंभीर आरोप केले जात आहेत. अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे क्रिकेट विश्वात अचानक खळबळ उडाली आहे.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अजिंक्य रहाणेने 17 महिन्यांनंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेने मैदानावर क्षेत्ररक्षण करताना असे काही केले, ज्यामुळे त्याच्यावर ICC नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आपल्या दोन्ही हातांवर थुंकताना दिसत आहे. अजिंक्य रहाणे हातावर थुंकल्यानंतर चेंडू उचलत असेल, तर आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन होईल, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

यावरून सोशल मीडियावर अजिंक्य रहाणेवर टीका होत आहे. आयसीसीने असा नियम केला आहे की, थुंकीने चेंडू चमकवण्यावर पूर्ण बंदी आहे आणि सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू असे करताना पकडला गेला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या नियमानुसार अजिंक्य रहाणे दोषी नसून ज्यांना नियमांची माहिती नाही ते अजिंक्य रहाणेवर टीका करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT