BCCI Ambati Rayudu Retirement  esakal
क्रीडा

BCCI Ambati Rayudu : अंबाती रायुडूने BCCI ला लावलं कामाला; निवृत्त खेळाडूंबाबतचे नियम बदलणार?

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Ambati Rayudu Retirement : बीसीसीआयने 7 जुलै रोजी अॅपेक्स काऊन्सीलची बैठक बोलावली आहे. या काऊन्सीलमध्ये वर्ल्डकपबाबतच्या अनेक गोष्टींवर निर्णय होणर आहे. याचबरोबर निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना परदेशातील टी 20 लीगमध्ये सहभाग होण्याबाबत बीसीसीआयची असलेल्या पॉलिसीची देखील समिक्षा होणार आहे.

बीसीसीआयच्या पॉलिसीनुसार नोंदणीकृत खेळाडूंना त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून, आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरच परदेशी क्रिकेट लीगमध्ये सहभाग नोंदवता येतो.

सीएसकेकडून खेळणाऱ्या अंबाती रायुडूने नुकतेच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. आता तो जुलै महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धेत टेक्सास सुपर लीगकडून खेळताना दिसणार आहे.

या निर्णयामुळे बीसीसीआयला आपले सक्रीय खेळाडू अशा लीगमध्ये खेळण्यासाठी निवृत्ती घेतील अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आपल्या अशा खेळाडूंना रोखण्यासाठी बीसीसीआय आपल्या नियमावलीत निवृत्त खेळाडूंबाबत एक परिच्छेद समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत क्रिकेटचा स्तर बिघडू नये यासाठी बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. टी 20 क्रिकेटचा प्रसार वाढल्यामुळे अनेक खेळाडू लवकर निवृत्ती घेऊ शकतात.

ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून बीसीसीआयने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. यामुळे आता बीसीसीआयच्या 7 जुलैच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे.

बीसीसीआयने सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी भारताचा पुरूष आणि महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

याचदरम्यान भारताचा प्रमुख संघ हा वर्ल्डकपची तयारी करत असेल. त्यामुळे एशियन गेम्ससाठी भारताचा दुय्यम संघ पाठवला जाईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT