MCA Election esakal
क्रीडा

MCA Election: पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे बनले MCAचे नवे अध्यक्ष

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शरद पवार- अशिष शेलार पॅनलचे अमोल काळे यांची मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)च्या अध्यक्ष पदी निवडून आले आहेत. त्यांचा २३ मतांनी विजय झाला आहे. एमसीएच्या निवडणुकीत पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे यांचा विजय झाला असून त्यांना या निवडणुकीत १८१ मतं मिळाली आहेत. या निकालानंतर अमोल काळे यांच्या समर्थकांनी जल्लोषात विजयाचं स्वागत केलं.

३४३ पैकी १८० पेक्षा जास्त मतं मिळाल्यानंतर निकाल औपचारिकपणे जाहील होण्याआधीच कार्यकर्त्यांनी जल्लोषाला स्वागत केले. अमोल काळे हे मागच्या तीन वर्षांपासून एमसीए मध्ये कार्यरत होते, त्यांच्याकडे उपाध्यक्षपद होते. दरम्यान या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यात युती पाहायला मिळाली होती. त्यामुळे या निकालांबाबात उत्सुकता लागली होती. दरम्यान या निवडणुकीत अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

संदीप पाटलांची पहिली प्रतिक्रिया..

चुरशीच्या निवडणूकीत संदीप पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अमोल काळे यांचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच त्यांनी या निवडणुकीसाठी एकत्र आलेले राजकारणी पुढेही एकत्र राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. मला आनंद आहे की माझ्यामुळे राजकारणी एकत्र आले, एकत्र राहणं महत्वाचं असतं, मुंबईचं क्रिकेट महत्वाचं आहे. संदीप पाटील महत्वाचा नाहीये असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: 'T20 मालिकेतील पराभवाचा वनडेवर परिणाम नाही, कारण...', कर्णधार गिल स्पष्टच बोलला; २०२७ वर्ल्ड कपचीही सांगितली योजना

School Robotics Lab: एआयमुळे शिक्षकांची भूमिका बदलली; घोडेगावातील कार्यशाळेत राजीव नंदकर यांचे प्रतिपादन

Balapur Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण; जीवन संपविण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक, पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Latur Police Raid: वाढवणा पोलिसांची तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT