Andre Russell 6 Consecutive Sixes In 6 Balls  sakal
क्रीडा

VIDEO : आंद्रे रसेलचा मैदानात धुमाकूळ; 6 चेंडूत सलग ठोकले 6 षटकार

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालताना दिसला

Kiran Mahanavar

Andre Russell 6 Consecutive Sixes In 6 Balls : वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल पुन्हा एकदा मैदानात धुमाकूळ घालताना दिसला आहे. यावेळी 6IXTY स्पर्धेच्या (The 6ixty Tournament) 9 व्या सामन्यात त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळताना, रसेलने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सविरुद्ध 72 धावांची तुफानी खेळी खेळली. फलंदाजीदरम्यान रसेलने विरोधी गोलंदाजांची पूर्ण धुव्वा उडवली. रसेलनेही सलग सहा चेंडूंत सहा षटकार ठोकले.

आंद्रे रसेलने सेंट किट्सविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे, परंतु हे सर्व षटकार रसेलच्या बॅटमधून एकाच षटकात आले नाहीत. खंर तर रसेलने प्रथम डॉमिनिक ड्रेक्सविरुद्ध शेवटच्या चार चेंडूंवर चार षटकार मारले आणि त्यानंतर पुढच्याच षटकात जॉन रस जग्सरने पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन उत्तुंग षटकार मारून हा पराक्रम पूर्ण केला.

आंद्रे रसेल मैदानात धुमाकूळ घालत होता. त्याने अवघ्या 24 चेंडूत 72 धावा केल्या. रसेलच्या बॅटमध्ये 5 चौकार आणि गगनचुंबी 8 षटकार पाहायला मिळाले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 300+ होता. रसेलच्या खेळीच्या जोरावर त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने 10 षटकांत 155 धावा केल्या.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या त्रिनबागो नाईट रायडर्सने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्ससमोर 60 चेंडूत 5 गडी गमावून 156 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सेंट किट्स संघाला निर्धारित षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 152 धावाच करता आल्या. संघासाठी खालच्या क्रमवारीत शेरफेन रदरफोर्डने अवघ्या 15 चेंडूत 50 धावांचे स्फोटक अर्धशतक झळकावले, पण तोही संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT