Russell-vs-Starc 
क्रीडा

Video: रसल vs स्टार्क, 6 चेंडूत 11 धावा... पाहा पुढे काय घडलं...

Video: रसल vs स्टार्क, 6 चेंडूत 11 धावा... पाहा पुढे काय घडलं... सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला पण...

विराज भागवत

सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला पण...

बार्बाडोस: टी२० विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ जोरदार तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियाने (Australia) वन डे विश्वचषक अनेकदा जिंकला असला तरी त्यांना अद्याप टी२० विश्वचषकावर (T20 World Cup) हवी तशी छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे सध्या विंडीज (West Indies) विरूद्ध सुरू असलेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ आपल्या कलागुणांना धार लावताना दिसत आहे. दुसरीकडे विंडिजचा संघदेखील टी२० मध्ये तगडा आहे. नुकतीच या दोन संघांमध्ये चौथी टी२० रंगली. या टी२०मध्ये खास आकर्षणाचा क्षण ठरला तो म्हणजे रसलच्या (Andre Russell) बॅटिंगपुढे मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) गोलंदाजी... (Video Goes Viral)

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १८९ धावा केल्या. मिचेल मार्श (७५) आणि आरोन फिंच (५३) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांनी धावसंख्या उभारली. त्यानंतर विंडिजकडून सलमीवीर सिमन्सने ७२ धावांची धडाकेबाज खेळी केली. पण इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे विंडिजला शेवटच्या षटकात ६ चेंडूत ११ धावा हव्या होत्या. त्यावेळी फलंदाजीसाठी आंद्रे रसल होता तर गोलंदाजीसाठी मिचेल स्टार्क होता. या दोघांमध्ये चांगलंच द्वंद रंगलं. त्यात अखेर ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.

पाहा कसा रंगला शेवटच्या ओव्हरमध्ये सामना-

रसलच्या फलंदाजीची स्टाईल सगळ्यांनाच माहिती असल्याने स्टार्कने अगदी शिस्तबद्ध गोलंदाजी केली आणि योग्य ठिकाणी फिल्डर उभे केले. त्यामुळे रसलला चौकार किंवा षटकार लगावताच आला नाही. अखेर एका चेंडूत ११ धावांवर परिस्थिती आली तेव्हा शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला. पण त्यावेळी वेळ निघून गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनगणनेत ११ नवे प्रश्न, दीड महिना चालेल प्रक्रिया; पहिल्यांदाच दुसरा टप्पा ५० दिवसांचा, कधी सुरुवात?

Dharashiv News: ऊसतोडीसाठी आणले, मजुरीऐवजी छळ! परंड्यात ४२ मजुरांना खोलीत डांबून मारहाण, महाराष्ट्रात हादरवून टाकणारी घटना

Shahu Maharaj on Gokul : 'गोकुळमध्ये जातीयवाद-धर्मवादाचा प्रश्नच येत नाही'; शाहू महाराजांनी मुश्रीफांचा दावा काढला खोडून, कामकाज सुरळीत करण्यासाठी सुचवला 'हा' पर्याय

Marathi News Live Updates : सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, कंदलगाव आणि अंत्रोळीतून १७ लाखांचे खाद्यतेल, पनीर जप्त; सांगोल्यातही दूध डेअरीवर छापा

Maharashtra FDA : ‘एफडीए’चे चार अधिकारी निलंबित, कारवाईत अनियमितता आणि गैरव्यवहार; २१ जणांची चौकशी

SCROLL FOR NEXT