Andy Murray Sakal
क्रीडा

Paris Olympic शेवटची स्पर्धा! दोन वेळचा सुवर्णपदक विजेता अँडी मरेचा टेनिसला अलविदा

Andy Murray Retirement: ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या अँडी मरेने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Andy Murray Retirement from Tennis: ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरे याने निवृत्तीची घोषणा केली आहे. मरेने स्पष्ट केले की आगामी पॅरिस ऑलिम्पिक ही त्याच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असणार आहे.

३७ वर्षीय मरे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात सामील होणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत तो पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर निवृत्त होणार असल्याचे सांगितले आहे.

त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'पॅरिसमध्ये मी माझ्या कारकीर्दीतील अखेरची टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी आलो आहे. ग्रेट ब्रिटनसाठी खेळणे, हे माझ्यासाठी आत्तापर्यंतचे सर्वात अविस्मरणीय आठवडे आहेत. आता अखेरच्यावेळीही मला ग्रेट ब्रिटनकडून खेळायला मिळणे, हा मोठा सन्मान आहे.'

अँडी मरे पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे. सर्वात आधी तो २००८ साली बिजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. परंतु, त्या स्पर्धेत त्याला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावं लागलं होतं.

पण नंतर त्याने २०१२ लंडन ऑलिम्पिक आणि २०१६ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीमध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यामुळे तो एकमेव पुरुष टेनिसपटू आहे, ज्याने एकेरीत दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत.

अँडी मरेने त्याच्या कारकीर्दीत २०१३ आणि २०१६ साली विम्बल्डन आणि २०१२ साली अमेरिकन ओपन ही ग्रँडस्लॅम विजेतीपदं मिळवली आहेत. मात्र २०१९ साली त्याला मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र, त्याला मोठी कामगिरी करता आली नाही. त्याला पाठीच्या दुखापतीमुळे यंदाच्या विम्बल्डनमध्येही फार काही करता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT