IND vs ENG Ben Stokes  esakal
क्रीडा

IND vs ENG : बेन स्टोक्सने केली मोठी चूक... अनिल कुंबळेने इंग्लिश कर्णधाराचा पकडला कच्चा दुवा

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG Ben Stokes Captaincy : हैदराबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या सत्रात 100 पेक्षा जास्त धावा केल्या. भारताच्या दोन विकेट्स देखील गेल्या. मात्र उपहारानंतर केएल राहुलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात आघाडी घेण्यास सुरूवात केली.

भारतीय फिरकीपटूंनी पहिल्याच दिवशी इंग्लंडचा 246 धावांवर खुर्दा उडवला होता. त्यानंतर इंग्लंडचे फिरकी गोलंदाज देखील भारताला सतावतील असे वाटत होते. मात्र तसं काही झालं नाही. भारताने दोन सत्रातच इंग्लंडवर आघाडी मिळवण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने बेन स्टोक्सच्या कॅप्टन्सीमधील त्रुटी दाखवून दिल्या. अनिल कुंबळे दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रानंतर बोलताना म्हणाला की, 'मला वाटते की इंग्लंडने ट्रिक मिस केली. चेंडू फिरकी असतानाही त्यांनी जो रूटचा योग्य वापर केला नाही. क्रीजवर यशस्वी जयस्वाल होता. तो डावखुरा फलंदाज आहे. आपण पाहिलं आहे की अश्विन डावखुऱ्या फलंदाजांना कसं अडचणीत आणतो. त्यामुळे इंग्लंडने मोठी चूक केली.'

इंग्लंडच्या फिरकीपटूंना परिस्थितीचा फायदा उचलता आला नाही असं देखील अनिल कुंबळे म्हणाला, 'मला वाटतं इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगल्या लेथवर गोलंदाजी करता आली नाही. खेळपट्टीकडून मदत मिळत असताना देखील इंग्लंडचे गोलंदाज सातत्यपूर्ण गोलंदाजी करू शकले नाहीत. आपण भारतीय गोलंदाजांना पाहिलं ते चांगल्या लेंथवर गोलंदाजी करत होते.'

'या सामन्याचा विचार केला तर फिरकीपटूंनी सातत्यपूर्व गोलंदाजी करणे गरजेचे आहे. त्यांनी अतीआक्रमकपणा दाखवला. नक्कीच स्लिप आणि शॉर्टचे खेळाडू असावेत मात्र तुमच्या पदार्पण करणाऱ्या ज्याला लेंथ अजून सापडलेली नाही त्याला ही फिल्ड लावणे योग्य नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT