anil kumble reveals an untold secret about shane warne
anil kumble reveals an untold secret about shane warne  
क्रीडा

अनिल कुंबळेंनी शेअर केला शेन वॉर्नशी कनेक्टिंग स्लेजिंगचा किस्सा

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याने वयाच्या 52 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. थायलंडमध्ये ह्दयविकाराच्या झटक्याने त्याने प्राण गमावले. क्रिकेट जगतातील महान गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. शेन वॉर्नच्या जाण्याने क्रिकेट जगतावर शोककळा पसरलीये. अनेक दिग्गज क्रिकेटर्संनी त्याच्यासंदर्भातील काही खास आठवणी शेअर करत श्रद्धांजली वाहिली. भारतीय संघाचा लेग स्पिनर अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनीही शेन वॉर्नसोबतच्या आठवणीला उजाळा देत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. (anil kumble reveals an untold secret about shane warne)

दिवंगत क्रिकेटरला श्रद्धांजली वाहताना अनिल कुंबळे यांनी शेन वॉर्नसोबतच्या काही रहस्यमयी गोष्टींचा खुलासा केला आहे. शेन वॉर्नचे मित्र असलेल्या कुणालाही ऑस्ट्रेलियन संघाच्या स्लेजिंगचा सामना करावा लागायचा नाही, असे कुंबळेंनी म्हटले आहे. शेन वॉर्नसोबत मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या कोणत्याही खेळाडूसमोर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ स्लेजिंग करायचा नाही. या गोष्टीचा स्वत: अनुभव घेतल्याचा किस्साही त्यांनी शेअर केलाय.

अनिल कुंबळे यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय की, "ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे एक खास वैशिष्ट्ये होते. ते शेन वॉर्नचा मित्र असलेल्या खेळाडूसमोर कधीच स्लेजिंग करायचे नाहीत. मी त्याच्या मित्रापैकी एक होतो. त्यामुळेच मला ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगचा सामना कधीच करावा लागला नाही. वॉर्नी आपल्या मित्रांना अशा पद्धतीने जपायचा, अशा शब्दांत त्यांनी मैत्रीचा किस्सा शेअर केला.

भारतीय संघाविरुद्ध त्याने दमदार कामगिरी करुन दाखवलीये. त्यामुळे तो आणखी महान ठरतो. भारतीय संघ हा फिरकीपटूला चांगल्या पद्धतीने खेळायचा. त्यामुळे वॉर्नला भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करायची असायची. 1998 मध्ये क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकर विरुद्ध शेन वॉर्न अशी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. त्या मालिकेतील पहिल्या डावात वॉर्नने सचिनपेक्षा चांगली कामगिरी केली. तर दुसऱ्या डावात सचिन भारी पडला, या आठवणीलाही त्यांनी उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT