क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या तोंडावर संघाला दुहेरी धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

सकाळ ऑनलाईन टीम

भारतात होत असलेली एकदिवसीय क्रिकेट स्पर्धात तोंडावर आलेली असताना दक्षिण आफ्रिकेला दुहेरी धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज आणि भारतात खेळण्याचा अनुभव असलेला एन्रिच नॉर्किया याच्यासह सिसांडा मगाला हे दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेले आहेत.

आयपीएलमुळे नॉर्कियाला भारतात खेळण्याचा चांगला अनुभव आहे; मात्र त्याला पाठीची (लोअर बॅक) दुखापत झाली. मायदेशात नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो खेळला होता. मंगाला याच्या डाव्या पायाचा गुडघा दुखावला आहे. या दोघांचाही विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात समावेश होता.

दक्षिण आफ्रिका निवड समितीने लगेचच नॉर्किया आणि सिसांडा मगाला यांच्या ठिकाणी दुसऱ्या खेळाडूंची निवड केली. गोलंदाज अष्टपैलू असलेला फेलुकवायो याला पुनरागमनाची संधी दिली, तर वेगवान गोलंदाज लिझाड विलियम्स याची निवड केली.

नॉर्किया आणि सिसांडा मगाला यांना दुखापत होणे हे आमच्यासाठी फारच धक्कादायक आहे. या दोघांकडे चांगली गुणवत्ता आहे. त्यांच्या पुनरागमनासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असे दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेचा संघ २३ तारखेला भारतात दाखल होत आहे.

विश्वकरंडक स्पर्धेतील त्यांची सलामीची लढत ७ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होत आहे. फेलुकवायो आणि विलियम्स यांना विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांचा संघात समावेश होता; मात्र खेळण्याची संधी मिळाली नव्हती, असे वॉल्टर म्हणाले.

संघ ः तेंबा बावूमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विन्टॉन डिकॉक, रेझा हेन्रिक्स, मार्को यान्सेन, हेन्रिच क्लासेन, केवश महाराज, एडियन मार्करम डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, अँडिल फेलुकवायो, कागिसो राबाडा, ताब्रेझ शम्सी, रासी वॅन डर डुसेन आणि लिझार्ड विलियम्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT