Antim Panghal 
क्रीडा

Antim Panghal : कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने रचला इतिहास! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड चॅम्पियनशिप

सकाळ ऑनलाईन टीम

भारताची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने शुक्रवारी इतिहास रचला. अंतिम हिने २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेतील ५३ किलो वजनी गटात विश्वविजेता होण्याचा मान संपादन केला. सलग दुसऱ्यांदा विश्वविजेती बनणारी भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली, हे विशेष.

हरियानाच्या हिसार येथे वास्तव्याला असलेल्या अंतिम हिने युक्रेनच्या मारिया येफ्रेमोवा हिला ४-० असे पराभूत करीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. अंतिम हिने अंतिम फेरीतच नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले.

प्रतिस्पर्थ्यांना तिच्याविरुद्ध फक्त दोनच गुणांची कमाई करता आली. अंतिम हिने मागील वर्षी ज्युनियर जागतिक स्पर्धेमध्ये विजेता होण्याचा मान संपादन केला होता. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT