Arjun Tendulkar century on Ranji Trophy debut sakal
क्रीडा

Arjun Tendulkar: 'सचिनचा मुलगा आहेस हे...' युवराजच्या वडिलांनी अर्जुनला दिला होता गुरुमंत्र

अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू योगराज सिंग खूप चर्चेत

Kiran Mahanavar

Arjun Tendulkar Century on Ranji Trophy Debut : माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी करंडकातील पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने गोव्यासाठी हे शतक केलं. याआधी 1989 मध्ये सचिन तेंडुलकरनेही रणजी ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते. याच कारणामुळे चाहते अर्जुन तेंडुलकरची तुलना वडील सचिन तेंडुलकरसोबत करत आहेत. मात्र अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू योगराज सिंग खूप चर्चेत आहे.

अर्जुन तेंडुलकरला माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण देण्यात आले आहे. योगराज सिंग यांच्या गुरुमंत्राने काम केल्याचे चाहते सोशल मीडियावर म्हणत आहेत. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला शतक झळकावता आले. अर्जुन तेंडुलकरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तो यापूर्वी मुंबई संघाचा भाग होता. परंतु या खेळाडूला मुंबई संघात फारशी संधी मिळाली नाही. यामुळे त्याने मुंबईऐवजी गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी अर्जुन तेंडुलकरला गोव्याकडून खेळण्याची संधी मिळाली तेव्हा या फलंदाजाने शानदार शतक झळकावले.

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग म्हणाले होते की, सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यात युवराजने मला फोन केला. बाबा, अर्जुन दोन आठवडे चंदीगडमध्ये येणार आहे, सचिनने त्याला प्रशिक्षण देण्याची विनंती केली आहे. मग मी सचिनला नाही कसे म्हणू शकतो? तो माझ्या मोठ्या मुलासारखा आहे. पण माझी स्वतःची ट्रेनिंग पद्धत आहे म्हणून अर्जुनला सांगितले की पुढचे 15 दिवस विसरून जा की तू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहेस.

योगराज सिंगसोबत अर्जुन तेंडुलकरचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यासोबतच चाहते योगराज सिंगचे सोशल मीडियावर खूप कौतुक करत आहेत. दुसरीकडे अर्जुन तेंडुलकरच्या राजस्थानविरुद्धच्या खेळीबद्दल बोलायचे तर, या खेळाडूने 207 चेंडूत 120 धावांची शानदार खेळी केली. अर्जुन तेंडुलकरने आपल्या खेळीत 16 चौकार आणि 2 षटकार मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT