Arjun Tendulkar Goa Ranji Trophy Team esakal
क्रीडा

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचं नाव गोवा रणजी संघात नाही; 28 खेळाडूंची यादी जाहीर मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Arjun Tendulkar Goa Ranji Trophy Team : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला गेल्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने आपल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित देखील केले. मात्र आयपीएल हंगामानंतर त्याचे नाव कोठेही चर्चेत आले नाही.

अर्जुन तेंडुलकर हा दक्षिण विभागाकडून देवधर ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र ज्या गोवा संघाकडून अर्जुन तेंडुलकर गेला हंगाम रणजी ट्रॉफी खेळला होता त्या गोवा संघाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई सोडून गोव्याकडून आपली रणजी कारकीर्द सुरू करणारा अर्जुन तेंडुलकर हा आता गोवा संघाची साथ सोडण्याची शक्यता आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनने 18 जुलैला रणजी ट्रॉफी 2023 - 24 च्या हंगामासाठी आपल्या 28 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत अर्जुन तेंडुलकरचे नाव नाहीये. यामुळे आगामी रणजी ट्रॉफी हंगामात अर्जुन तेंडुलकर गोवा संघाकडून खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असले तरी अर्जुन तेंडुलकर दक्षिण विभागाकडून देवधर ट्रॉफी खेळताना दिसेल. (Arjun Tendulkar News)

गोव्याचा संघ देखील दक्षिण विभागात मोडतो. जर रणजीच्या संभाव्य संघात अर्जुन तेंडुलकरचे नाव नसेल तर तो गोवा सोडून दुसऱ्या कोणत्या तरी संघाकडून खेळणार असेल असे मानले जात आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत 7 अ श्रेणीचे सामने आणि 7 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. अर्जुनने अ श्रेणीच्या सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 12 विकेट्स आणि 120 धावा देखील आहे.

याचबरोबर अर्जुनने टी 20 क्रिकेटमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये देखील अर्जुनने पदार्पणाच्या हंगामात 4 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT