Jay Shah Sri Lanka Cricket Arjuna Ranatunga esakal
क्रीडा

Jay Shah Sri Lanka Cricket : श्रीलंका क्रिकेट जय शहा चालवतात... लंकेचा माजी कर्णधार हे काय म्हणतोय?

अनिरुद्ध संकपाळ

Jay Shah Sri Lanka Cricket Arjuna Ranatunga : भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली बोर्ड आहे हे सर्वजण जाणतात. मात्र बीसीसीआय आणि त्याचे पदाधिकारी दुसऱ्या देशाचे क्रिकेट बोर्ड चालवतात असा आरोप झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

श्रीलंका क्रिकेट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आयसीसीने नुकतेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे निलंबन केलं आहे. यानंतर आता श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाने बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यावर श्रीलंका क्रिकेटबोर्डावर नकारात्मरित्या प्रभावित करत आहेत असा आरोप केला.

बीसीसीआय हे जगातील सर्वात प्रभावशाली क्रिकेट बोर्ड आहे. क्रिकेट वर्तुळातील बरीच ताकद ही बीसीसीआयकडे एकवटली आहे. बीसीसीआयचे कर्ताधर्ता सध्या जय शहा (Jay Shah), राजीव शुक्ला आणि रॉजर बिन्नी आहेत. त्यांच्या निर्णयांचा क्रिकेट वर्तुळावर दूरगामी परिणाम होतो.

अर्जुन रणतुंगाच्या मते श्रीलंका क्रिकेट (Sri Lanka Cricket) बोर्डाचे अधिकारी आणि जय शहा यांच्यातील संबंधामुळे बीसीसीआयमध्ये आपण बाहेरून श्रीलंका क्रिकेट बोर्डाची सूत्रे हलवू शकतो अशी भावना निर्माण झाली आहे. हे वक्तव्य त्याने डेली मिररशी बोलताना केले.

त्याने जय शहा हे श्रीलंका क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत. जय शहांनी दबाव टाकल्यामुळे सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

वर्ल्डकपमधील कामगिरीनंतरचा घटनाक्रम

श्रीलंका भारतात होत असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला आहे. त्याचे सेमी फायनलचे स्वप्न कधीच भंगले असून मैदानावरील कामगिरीचे मैदानाबाहेर देखील पडसाद पडले आहेत. इतकेच काय 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देखील ते पात्र होऊ शकलेले नाहीत.

या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्डच बर्खास्त करून टाकलं. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा कारभार सांभाळण्यासाठी अर्जुना रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली तात्कालिक समिती नेमली. मात्र हा निर्णय कायद्याच्या कचाट्यात सापडला. कोर्टाने या निर्णयावर स्थगिती आणत जुन्या क्रिकेट बोर्डाचे प्रशासन पुनर्स्थापित केले.

मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आयसीसीने दणका देत त्यांचे तात्काळ निलंबन केलं. यावेळी बोर्डात सरकारचा अवाजवी हस्तक्षेप सुरू असल्याचं कारण देण्यात आलं.

याचा परिणाम श्रीलंकेच्या क्रिकेटवर झाला असून त्यांना आयसीसी त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेत नाही तोपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकावं लागणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

Pune Fraud : अघोरी विधीच्या नावाखाली पुण्यात तरुणीची सव्वातीन लाखांची फसवणूक

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT