Arshdeep Singh ICC Emerging Player Of The Year esakal
क्रीडा

Arshdeep Singh : अर्शदीप सिंग! टी 20 पाठोपाठ वनडे संघात स्थान आता... ICC ने दिली आनंदाची बातमी

अनिरुद्ध संकपाळ

Arshdeep Singh ICC Emerging Player Of The Year : भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला श्रीलंकेविरूद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी दोन्ही संघात स्थान देण्यात आले आहे. आता आयसीसीने त्याला अजून एक आनंदाची बातमी दिली. आयसीसीने ICC Emerging Player Of The Year पुरस्काराचे नॉमिनेशन जाहीर केले. यात मार्को जेनसन, फिन अॅलन, इब्राहीम जादरान आणि भारताचा अर्शदीप सिंग यांच्या नावाचा समावेश आहे.

अर्शदीप सिंगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवून सहा महिने देखील झालेले नाहीत. एवढ्या कमी वेळात देखील अर्शदीपने आयसीसी उदयोन्मुख खेळाडूंचे नामांक मिळवले. अर्शदीप सिंगने आतापर्यंत 21 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 18.12 च्या सरासरीने 33 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सिंगने नव्या आणि जुन्या चेंडूवर देखील विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंगने भारताकडून पदार्पण करत चांगली कामगिरी केली. अर्शदीपने टी 20 पाठोपाठ न्यूझीलंड दौऱ्यावर वनडे क्रिकेटमध्ये देखील भारताकडून पदार्पण केले. (Sports Latest News)

अर्शदीपने ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यात दमदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या स्विंग गोलंदाजीने पाकिस्तानचे तगडे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला बाद केले. त्यानंतर त्याने पाकिस्तानचा मॅच फिनिशर आसिफ अलीला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. या सामन्यात अर्शदीपने 32 धावात 3 फलंदाज बाद केले होते.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election 2025 : पुण्यात मविआचं जागावाटप ठरलं, ठाकरेंच्या जागांमध्ये मनसेला वाटा; शरद पवारांच्या शिलेदारानं दिली माहिती

Brown Shrike : गुलाबी थंडीत कृष्णाकाठी अवतरला विदेशी पक्षी; उत्तर आशियातून प्रथमच दाखल, काय आहे 'खाटीक'चं वैशिष्ट्य?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये भररस्त्यावर तरुणांची गुंडागर्दी; दगडफेक व काठ्यांनी हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Sleeping Habits Winter: तोंडावर पांघरुन घेऊन झोपताय? वेळीच ही सवय बदला, अन्यथा...

Google Search : 2025 वर्षांत गुगलवर सर्च झाल्या 'या' 10 अत्यंत भयानक गोष्टी; धक्कादायक माहिती बाहेर आल्याने जग हादरलंय

SCROLL FOR NEXT