Australian Open 2024  esakal
क्रीडा

Australian Open 2024 : सबलंकाने सलग दुसऱ्यांदा जिंकली ऑस्ट्रेलिया ओपन

अनिरुद्ध संकपाळ

Aryna Sabalenka Australian Open 2024 : अरिना सबलंकाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या खिताबावर आपला कब्जा केला आहे. बेलारूसच्या सबलंकाने फायनलमध्ये चीनच्या क्विनवेन झेहेंगचा पराभव करत आपले दुसरे ऑस्ट्रेलियन ओपनचे टायटल जिंकले. तिने झेहेंगचा 6-3, 6-2 असा पराभव केला. सबलंकाने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तीन मानांकित खेळाडूंना पराभूत केलं.

ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या झहेंगचा सामना बेलारूसच्या गतविजेत्या अरिना सबलंका सोबत होता. झहेंग ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पहिल्यांदाच पोहचली होती.

हा सामना एक तास आणि 16 मिनिटे चालला. यात दोन सेटमध्येच सबलंकाने चीनच्या टेनिसपटूंचा पराभव झाला. चीनची टेनिसपटू फायनल खेळताना थोडी नर्व्हस होती. ती ग्रँड स्लॅमची फायनल खेळणारी इतिहासातील दुसरीच टेनिसपटू होती.

अनुभवी सबलंका देखील नर्व्हस झाली होती. तिने पहिला सेट 5-2 असा जिंकत असतानाच दोन ड्युसचा सामना करावा लागला. मात्र तिने पहिला सेट 6-3 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये देखील सबलंकाने चीनच्या टेनिसपटूला संधी दिली नाही. तिने दुसरा सेट 6-2 असा जिंकत आपले दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT