AUS vs ENG Twitter
क्रीडा

AUS vs ENG : रुटचं अर्धशतक अन् पॅट कमिन्सची हवा; बाकी सगळे...

सुशांत जाधव

Ashes 2021 Australia vs England 3rd Test Day 1 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपला निर्णय सार्थ करण्यासाठी त्याने स्वत: दमदार गोलंदाजी करत पुन्हा एकदा पाहुण्या इंग्लंड संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. डावातील दुसऱ्याच षटकातील पाचव्या चेंडूवर हसीब हमीदच्या रुपात (Haseeb Hameed) पॅट कमिन्सनं (Pat Cummins) इंग्लंडला पहिला धक्का दिला. काही अंतराने दुसऱ्या सलामीवीरालाही पॅट कमिन्सनंच माघारी धाडले. झॅक क्राव्ले Zak Crawley 12 धावांची भर घालून तंबूत परतला.

दुसरी विकेट पडली त्यावेळी इंग्लंडच्या धावफलकावर अवघ्या 13 धावा होत्या. यातील 12 धावा या क्राव्लेनं केल्या होत्या. डेविड मलान (Dawid Malan) आणि जो रुट (Joe Root ) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी रचली. ही जोडी संघाला ट्रॅकवर घेऊन जातेय असत चित्र निर्माण होत असताना पॅट कमिन्सनं पुन्हा एक घाव घातला. त्याने डेविड मलानला 14 धावांवर माघारी धाडले. दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर स्टार्कने त्याला तंबूचा रस्ता दाखवत सामन्यातील पहिले यश मिळवले. रुटनं 82 चेंडूत 50 धावांची खेळी केली. बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्ट्रो या जोडीने 33 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. लायनने बेन स्टोक्सच्या संयमी खेळीला लगाम लावला. त्याने स्टोक्सला 25 धावांवर तंबूत धाडले. 115 धावांत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता.

ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानात इंग्लंडची अवस्था बिकट केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीसह त्यांनी मालिकेवर तगडी पक्कड मिळवलीये. तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरला आहे. तिसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा इंग्लंड बॅकफूटवर असून पुन्हा एकदा ते अडचणीत सापडले आहेत. डेविड मलान आणि रुटशिवाय इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना नावाला साजेसा खेळ करण्यात सातत्याने अपयश आले असून ही गोष्टच इंग्लंडच्या संघाला गोत्यात आणणारी ठरलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार विजयी

Nagar Parishad Election Result : शिरोळमध्ये विद्यमान आमदारांना तगडा झटका, यड्रावकर–माने गटाची सत्ता संपुष्टात, मुरगूड–कागल–गडहिंग्लजमध्ये आघाड्यांचे वर्चस्व

Manchar Nagar Panchayat Election Result 2025: मंचर नगराध्यक्षपदाची अटीतटीची लढत; दुसऱ्या फेरीअखेर शिवसेना आघाडीवर

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Ex Agniveer BSF Recruitment : मोदी सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना 'बीएसएफ कॉन्स्टेबल' भरतीत ५० टक्के कोटा निश्चित

SCROLL FOR NEXT