Ashes 2023 Controversy  esakal
क्रीडा

Ashes 2023 Controversy : नो कमेंट्स मात्र तरी देखील आम्ही... अ‍ॅशेसमधील बॉल बदलण्याच्या वादावर आयसीसीने दिली प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

Ashes 2023 Controversy : अ‍ॅशेस मालिकेतील ओव्हलवर झालेल्या पाचव्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत मालिका 2 - 2 अशी बरोबरीत आणली. पहिल्या दोन कसोटीत विजय मिळवून मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मालिकेच्या शेवटी 2 - 2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

मात्र पाचव्या कसोटीत इंग्लंडने ठेवलेल्या 384 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 335 धावांपर्यंत मजल मारत विजयासाठी पराकाष्ठा केली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावादरम्यान काही वादही उद्भवले.

पाचव्या दिवशी फक्त 35 षटके टाकून झाल्यानंतर बॉल बदलण्यात आला. बदललेला चेंडू हा आधीच्या चेंडूच्या तुलनेत अधिक नवीन, शाईन असलेला आणि टणक होता असा दावा ऑस्ट्रेलियाने केला आहे.

बॉल बदलण्यात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या काही विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने या बॉल बदलण्याच्या अंपायर्सच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने देखील इंग्लंडला अतिरिक्त फायदा पोहचल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू याबाबत आरडाओरडा करू लागल्यानंतर आता खुद्द आयसीसीने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

आयसीसीचे प्रवक्ते म्हणाले की, 'आयसीसी सामन्यात अंपायर्सनी घेतलेल्या निर्णयावर कधीही प्रतिक्रिया देत नाही. मात्र तरी देखील आम्ही हे निश्चित सांगू शकतो की सर्व चेंडू हे प्रत्येक सामना सुरू होण्यापूर्वी निवडले जातात. ज्यावेळी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी सामना अधिकारी परिस्थितीच्या जवळ जाणारा चेंडू निवडतात.'

बॉल बदलल्यानंतर उस्मान ख्वाजाने थेट अंपायर्सशी संपर्क साधला होता. सामना झाल्यावर ख्वाजा म्हणाला की, 'मी थेट कुमारकडे (अंपायर) गेलो आणि सरळ सांगितलं की हा चेंडू आम्ही खेळत असलेल्या चेंडूच्या जवळपास देखील जात नाही.'

'तो संपूर्ण मालिकेत वापरण्यात आलेल्या इतर कोणत्याही चेंडूपेक्षा जास्त टकण होता. मी कायम नवीन चेंडूवरच सलामीला येतो. मला माहिती नाही की काय चाललं आहे. तुम्ही जुन्या रिव्हर्स स्विंग होणाऱ्या चेंडूपासून नवीन चेंडूकडे चालला आहात.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmers: सात महिन्यांत ५४३ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; ३३९ प्रकरणे मदतीसाठी पात्र, सर्वाधिक बीड जिल्ह्यात, मार्चमध्ये ११०

Tech Mahindra: टेक महिंद्राचे शेअर्स आज पुन्हा घसरले; खरेदी करावा की विकावा? ब्रोकरेजचा काय अंदाज आहे?

Vastu Tips: ऑफिस डेस्कवर 'या' 3 रंगाच्या वस्तू असल्यास करिअरमध्ये येऊ शकतात अडथळे, वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Blast Video : अँकरींग सुरू असतानाच बॉम्ब स्फोट; इस्रायलचा सीरियावर हल्ला, असंख्य लोकांचा मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

Viral Video: बापरे...! अचानक पीएमटी बसचा ब्रेक झाला फेल, पुढे काय झाले पाहा

SCROLL FOR NEXT