Ashes AUSvsENG 2nd Test Marnus Labuschagne
Ashes AUSvsENG 2nd Test Marnus Labuschagne 
क्रीडा

Ashes : वॉर्रनचे शतक हुकले, लॅम्बुशग्नेच्या शतकाची प्रतिक्षा लांबली

अनिरुद्ध संकपाळ

अ‍ॅडलेड : अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना (Ashes AUSvsENG 2nd Test) अ‍ॅडलेड येथे सुरु झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी आपले वर्चस्व गाजवले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मार्नस लॅम्बुशग्नेच्या (Marnus Labuschagne) दमदार दीडशतकी (172) भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 2 बाद 221 धावांपर्यंत मजल मारली.

शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या डेव्हिड वॉर्रनला (David Warner) पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात शतकाने हुलकावणी दिली. तो 95 धावा करुन बाद झाला. तर मार्नस लॅम्बुशग्नेने देखील दिवस अखेरपर्यंत नाबाद 95 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ संपला असल्यामुळे लॅम्बुशग्नेच्या शतकाची प्रतिक्षा आता दुसऱ्या दिवसापर्यंत लांबली आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 221 धावा केल्या होत्या. मार्नस लॅम्बुशग्ने 95 धावांवर तर स्टीव्ह स्मिथ 18 धावा करुन नाबाद आहेत.

पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, दिवस अखेर 2 बाद 221 धावा

मार्नस लॅम्बुशग्ने सलग दुसऱ्या शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच पहिल्या दिवसाचा खेळ संपला

डेव्हिड वॉर्नरचे पुन्हा शतक हुकले, स्टोक्सने 95 धावांवर केले बाद

डेव्हिड वॉर्नरची आक्रमक फलंदाजी, लॅम्बुशग्नेसोबत दीडशतकी भागीदारी

मार्नस लॅम्बुशग्ने - डेव्हिड वॉर्नर यांची शतकी भागीदारी; दोघांचीही अर्धशतके पूर्ण

ऑस्ट्रेलियाची सावध फलंदाजी, डिनरपर्यंत 25 षटकात केल्या 45 धावा.

हॅरिसचा जोस बटलरने (Jos Buttler) घेतला अप्रतिम झेल

ऑस्ट्रेलियाला स्टुअर्ट ब्रॉडने दिला पहिला धक्का, मार्कस हॅरिस 3 धावा करुन बाद

स्टीव्ह स्मिथने नाणेेफेक जिंकत फलंदाजीचा घेतला निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT