Nathan Lyon
Nathan Lyon esakal
क्रीडा

AUSvsENG : लायनकडून लायन्सचीच शिकार; कांगारुंची विजयी सुरुवात

अनिरुद्ध संकपाळ

ब्रिसबेन : ऑस्ट्रेलियाने (Australia) गाबा कसोटीत (Gabba Test) इंग्लंडचा चौथ्या दिवशी इंग्लंडचा 9 विकेट्सनी पराभव केला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने अॅशस मालिकेत (Ashes Test Series) 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 297 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 20 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 9 फलंदाज राखून पार केले. नॅथन लायनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला चौथ्या दिवशी खिंडार पाडले. त्याने 4 विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 2 बाद 220 वरुन सर्वबाद 297 अशी झाली. (Ashes AUSvsENG Australia Won 1st Test Against England at Gabba)

इंग्लंडने (England) चौथ्या दिवशी 2 बाद 220 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र लायनने डेव्हिड मलानला 82 धावांवर बाद करत रूट - मलान ही दीडशतकी भागीदारी करणारी जोडी फोडली. येथूनच इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला मोठी गळती सुरु झाली. बघता बघता 2 बाद 220 वर असणऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव 297 धावा संपुष्टात आला. (Ashes Test Series)

ऑस्ट्रेलियाकडून ऑफ स्पिनर नॅथन लायनने (Nathan Lyon) 91 धावा देत 4 बळी टिपले. त्याला कमिन्स आणि ग्रीनने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. स्टार्क आणि हेजलवूडने प्रत्येकी 1 विकेट घेतली. इंग्लंडला दुसऱ्या डावात फक्त 19 धावांचीच आघाडी घेता आली.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 20 धावांची गरज होती. मात्र या 20 धावा करतानाही ऑस्ट्रेलियाने एक फलंदाज गमावला. अॅलेक्स कॅरीला रॉबिन्सनने 9 धावांवर बाद केले. अखेर ऑस्ट्रेलियाने 6 व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब करत गाबावरील विजयी परंपरा कायम ठेवली.

तत्पूर्वी, गाबा कसोटीत इंग्लंडने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा पहिला डाव 147 धावात संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 425 धावांचा डोंगर रचला. ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) धडाकेबाज फलंदाजी करत 148 चेंडूत 152 धावांची तुफानी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनेही (David Warner) 94 धावांचे योगदान दिले. तर मार्नस लॅम्बुशग्नेने 74 धावा केल्या.

दुसऱ्या डावात इंग्लंडने झुंजार वृत्ती दाखवत दमदार सुरुवात केली. कर्णधार जो रुट आणि डेव्हिड मलान यांनी तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी रचली. रुटने (Joe Root) 89 तर मलानने(Dawid Malan) 82 धावांची खेळी केली.

मात्र चौथ्या दिवशी नॅथन लायनने (Nathan Lyon) इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडत 2 बाद 220 वर असणाऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव 297 धावात गुंडाळला. लायनने 4 विकेट घेतल्या. त्यानंतर 19 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 व्या षटकात पार करत गाबा कसोटी आपल्या नावावर केली. अॅशेस मालिकेत (Ashes) ऑस्ट्रेलियाने 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT