ind vs pak file photo
क्रीडा

भारतासाठी पाकिस्तानहून श्रीलंकेत सेट केलेली स्पर्धा रद्द!

भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिल्यामुळे स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेला मिळाले होते.

सुशांत जाधव

भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिल्यामुळे स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेला मिळाले होते.

पाकिस्तानचा (Pakistan Cricket Team) डाव बारगळ्यानंतर श्रीलंकेच्या (Sri Lanka) मैदानात नियोजित आशियाई चषक स्पर्धा (Asia Cup 2021) अखेर रद्द झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Covid 19) स्पर्धा घेणं शक्य नाही, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. या स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार होते. मात्र भारतीय संघाने (Indian Cricket Team) पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिल्यामुळे स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेला मिळाले होते. जूनमध्ये ही स्पर्धा नियोजित होती. (Asia Cup 2021 Called Off Over covid 19 threat set to be organised in srilanka)

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एश्ले डी सिल्वा यांनी प्रसारमाध्यमांना स्पर्धा रद्द झाल्याची माहिती दिलीये. ते म्हणाले की, सध्याच्या घडीला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात ही स्पर्धा घेणं शक्य नाही. 2023 नंतरच्या वर्ल्डकपनंतरच या स्पर्धेचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील दोन वर्ष आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक ठरले आहे. त्यामुळे ही स्पर्धा मध्येच घेणं शक्य होणार नाही, असे ते म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत नियोजित आशियाई क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे भारतीय संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासंदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकाबाजूला प्रमुख संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना श्रीलंका दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी भारतीय संघ वेगळा संघ पाठवणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. 13 जुलैला वनडे सामन्याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील दौऱ्याला सुरुवात होणार असून 27 जुलैला टी20 सामन्याने दौऱ्याची सांगता होईल. आशिया चषक स्पर्धा रद्द झाल्यामुळे भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT