Asia Cup 2022 Afghanistan Defeat Sri Lanka With The Help Of Bowling Coach Umar Gul Former Pakistan Pace Bowler esakal
क्रीडा

Asia Cup 2022 : श्रीलंका सर करण्यात अफगाणिस्तानला लाभली 'पाकिस्तानी' मदत

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 Sri Lanka vs Afghanistan: आशिया कपच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 8 विकेट्स राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने श्रीलंकेचा डाव 105 धावात संपुष्टात आणला. अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या दोन षटकातच श्रीलंकेची अवस्था 3 बाद 5 धावा केल्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज फैजलहक फारूकीने 11 धावा देत 3 विकेट घेतल्या. अफगाणिस्तानच्या या विजयात त्यांचा बॉलिंग कोच उमर गुलचा देखील मोठा वाटा आहे. उमर गुल हा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या इनपुट्सच्या जोरावरच अफगाणी गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. (Asia Cup 2022 Afghanistan Defeat Sri Lanka With The Help Of Bowling Coach Umar Gul Former Pakistan Pace Bowler)

अफगाणिस्तानकडून फैजलहक फारूकी बरोबरच कर्णधार मोहम्मद नबी आणि नजीब उर रेहमानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेचे 106 धावांचे आव्हान अफगाणिस्तानने रेहमानुल्ला गुरबाजने 40 तर हझरतुल्ला झजाईने 37 धावा केल्या. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षाने 38 तर चमिका करूणारत्नेने 31 धावा केल्या.

आशिया कपमधील ग्रुप B मधील हा पहिलाच सामना होता. ग्रुप B मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. तर ग्रुप A मध्ये भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे. या दोन्ही ग्रुपमधील पहिले दोन संघ सुपर फोर फेरी खेळणार आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानने आपला पहिला सामना जिंकून ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

आता पडद्यावर न पाहिलेले सीन्सही दिसणार! 'Dhurandhar 2' OTT वर प्रदर्शित होणार, कधी, कुठे? वाचा

Paper Leak Case: १० लाखांत कुरिअरने आला, १५ लाखांना विकला अन्... महाराष्ट्रात NEET चा पेपर कसा फुटला? धक्कादायक खुलासा

Dunes League T20 : क्रिकेटच्या कक्षा रुंदावतायेत! सौदी अरेबिया फ्रँचायझी लीगच्या मैदानात; युवराज सिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

SCROLL FOR NEXT