asia cup 2022 final sri lanka vs pakistan sakal
क्रीडा

Pak vs Sl Asia Cup : श्रीलंका-पाकिस्तान अंतिम सामना 'फ्री' कुठे पाहायचा जाणून घ्या

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2022 चा अंतिम सामना केव्हा आणि कुठे पाहायचा

Kiran Mahanavar

Pak vs Sl Asia Cup : आशिया चषक 2022 चा अंतिम सामना 11 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार आहे. हे दोन्ही संघ सुपर 4 गुणतालिकेत अव्वल 2 मध्ये राहून येथे पोहोचले आहेत. सुपर 4 मध्ये कोणताही संघ श्रीलंकेला पराभूत करू शकला नाही. तर पाकिस्तानला सुपर 4 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केवळ पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आज श्रीलंकेच्या नजरा 6 व्या आशिया चषक विजेतेपदावर असतील, तर पाकिस्तानला तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याची इच्छा असेल.

आशिया चषकमध्ये या दोन्ही संघांमध्ये विजेतेपदाचा चौथ्यांदा सामना होणार आहे. श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानला दोनदा पराभूत केले आहे. 1986 आणि 2014 मध्ये तो चॅम्पियन झाला तेव्हा पाकिस्तानी संघ उपविजेता ठरला होता. 2000 मध्ये श्रीलंकेला हरवून पाकिस्तान चॅम्पियन बनला होता.

  • श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार?

    श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा अंतिम सामना 11 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळल्या जाणार आहे.

  • सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

    आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता.

  • श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 'फ्री' कुठे पाहायचा

    हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT