Asia Cup 2022 Fitness Test Will Be Conducted For Team India esakal
क्रीडा

Asia Cup 2022 : आशिया कपसाठी रोहित, विराटसह सर्वांची होणार फिटनेस टेस्ट

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 : यंदाचा आशिया कप हा युएईमध्ये 27 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. भारत आशिया कपमध्ये आपले अभियान 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याने करणार आहे. आशिया कपमध्ये भारताला टी 20 वर्ल्डकपमधील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आहे. युएईमध्येच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा इतिहासात पहिल्यांदाच पराभव केला होता.

दरम्यान, आशिया कपसाठी निवडलेला संघ बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करणार आहे. याचदरम्यान, संघाची फिटनेस टेस्ट देखील होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांना देखील फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ही फिटनेस चाचणी एनसीएमध्ये 18 ऑगस्ट रोजी होणार असून संघ 20 ऑगस्टला युएईला रवाना होईल. त्यानंतर पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी एक आरोग्य तपासण देखील होणार आहे.

आशिया कपसाठीचा भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT