Asia Cup rohit sharma
Asia Cup rohit sharma sakal
क्रीडा

Asia Cup : आशिया कपपूर्वी 'या' खेळाडूने वाढवलं कप्तान रोहितचं टेन्शन

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 : जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सध्या काही दिवसांनी सुरू होणाऱ्या आशिया चषकाकडे लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये होणार आहे. दोन्ही देशांचे क्रीडाप्रेमी या सामन्याची वाट पाहत आहेत. 2021 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाचा स्टार ओपनिंग बॅट्समन केएल राहुल नुकताच झिम्बाब्वेविरुद्ध दीर्घ दुखापतीनंतर परतला. मात्र त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही.

झिम्बाब्वे दौऱ्यावर फलंदाज म्हणून त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. केएल राहुलच्या बॅटला धावा मिळाल्या नाहीत. या मालिकेत पहिल्या सामन्यात डावाची सुरुवात न केल्यामुळे राहुलला फलंदाजी मिळाली नाही. तर पुढच्या सामन्यात त्याने फक्त एक धाव करतो आली. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु त्याने केवळ 30 धावा केल्या. अशा स्थितीत आशिया चषकापूर्वी राहुलचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे.

राहुलचा सध्याचा फॉर्म पाहता सलामीची जबाबदारी त्याच्याकडून काढून घेतली तर विराट कोहली रोहित शर्मासोबत डावाची सलामी करताना दिसू शकतो. विराटने यापूर्वीही ही जबाबदारी घेतली आहे आणि रोहितसोबत त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. याशिवाय या जबाबदारीसाठी ऋषभ पंतवर पुन्हा प्रयत्न केले जाऊ शकतात.

आशिया कपसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT