Asia Cup 2022 Ind vs Pak sakal
क्रीडा

Asia Cup : Ind vs Pak यांच्यात आणखी एक हाय व्होल्टेज सामना रंगणार; जाणून घ्या शेड्युल

आशिया चषक 2022 मध्ये सात दिवसात भारत आणि पाकिस्तानचे संघ दुसऱ्यांदा भिडणार

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 India vs Pakistan : आशिया कपमधील आणखी एक हाय व्होल्टेज सामना रविवारी खेळल्या जाणार आहे. आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाने दोन सामन्यात विजय मिळवून सुपर-4 मध्ये पोहोचली आहे. पाकिस्तानने त्याचवेळी शुक्रवारी हाँगकाँगविरुद्ध मोठा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गेल्या रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्यावेळी दोन्ही संघ 10 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमने-सामने आली होती. गेल्या वर्षी याच मैदानावर भारताने टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाची फलंदाजी आणि भुवनेश्वर कुमारची घातक गोलंदाजी यामुळे टीम इंडियाने तो सामना जिंकला होता.

सुपर-4 वेळापत्रक

आशिया चषक 2022 च्या सुपर-4 मध्ये अ गटा मधून भारत आणि पाकिस्तान तर ब गटातून अफगाणिस्तान आणि श्रीलंकाने स्थान निश्चित केले आहे.

  • पहिला सामना शनिवारी (3 सप्टेंबर) - श्रीलंका आणि अफगाणिस्तान

  • दुसरा सामना रविवारी (४ सप्टेंबर) - भारत आणि पाकिस्तान

  • तिसरा सामना मंगळवारी (6 सप्टेंबर) - भारत आणि श्रीलंका

  • चौथा सामना बुधवारी (7 सप्टेंबर) - अफगाणिस्तान आणि पाकिस्तान

  • पाचवा सामना गुरुवारी (८ सप्टेंबर) - भारत आणि अफगाणिस्तान

  • सुपर-4 चा शेवटचा सामना शुक्रवारी (9 सप्टेंबर) - पाकिस्तान आणि श्रीलंका

भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग चार सामने जिंकले आहेत

आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग चौथ्यांदा पराभव केला. यापूर्वी 2016 मध्ये भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला होता. यानंतर 2018 आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT