asia cup 2022 india vs pakistan sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : रवी शास्त्रींनी Ind vs Pak सामन्याच्या टायमिंगवर केली टीका

भारत-पाक सामना दुबईच्या वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल यावर रवी शास्त्री यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सामना 28 ऑगस्टला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकादरम्यान दुबईतील याच मैदानावर पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या हाय व्होल्टेज मॅचबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. भारत-पाक सामना दुबईच्या वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल यावर रवी शास्त्री यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, टी-20 विश्वचषक 2021 दरम्यान 90 टक्के सामने जिंकणाऱ्या संघाने नाणेफेक जिंकले होते. दुबईत 6 वाजता सामना सुरू झाला, तर नंतर गोलंदाजी करणार्‍या गोलंदाजाचे नुकसान होईल. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला दवचा फायदा होतो. कारण पहिल्या संघाने संध्याकाळी 6 वाजता फलंदाजी केली तर दुसऱ्या संघाला नेहमीच फायदा होतो.

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी खेळाडूंनी आपले फोन बंद करावेत, असा सल्ला रवी शास्त्री यांनी खेळाडूंना दिला. तसेच शास्त्री म्हणाले की, त्याने आपल्या मेहनतीवर अवलंबून राहावे, सामन्यात कोणत्याही प्रकारचे दडपण घेण्याची गरज नाही.

आशिया चषकासाठी दोन्ही देशांची संघ :

भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: ठाणे-नवी मुंबईत उभं राहणार नवं ‘बीकेसी’! १,३०० एकरवर भव्य व्यावसायिक केंद्राची घोषणा, पण कुठे उभारणार?

Pune : बिबट्या हल्ला करतो, नरडीचा घोट घेतो; शेतकऱ्यांवर गळ्यात लोखंडी खिळ्यांचे पट्टे घालण्याची वेळ

Palghar News: पालघरचा चेहरा-मोहरा बदलणार! ३०० एकरवर वन उद्यान उभारणार; पालकमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला

Crime: आरजेडीला मत का नाही दिले? आधी वाद घातला, नंतर वृद्धाला क्रूरपणे संपवलं, घटनेनं खळबळ

Jalgaon News : जळगाव महापालिकेत 'भाजप विरुद्ध सर्व'! भाजप वगळता सर्वांशी युती, महाविकास आघाडीचा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT