Asia Cup 2022 India Vs Pakistan Rishabh Pant Not Playing Dinesh Karthik Will Keep Wicket  esakal
क्रीडा

Rishabh Pant : रोहित शर्माने ऋषभला वगळले पहिली पसंती दिनेश कार्तिकलाच

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 India Vs Pakistan Rishabh Pant : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रोहित शर्माने संघनिवडीवेळी एक मोठा निर्णय घेतला. रोहित शर्माने प्लेईंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) संघात स्थान दिले आहे. दिनेश कार्तिकच आजच्या सामन्यात विकेटकिपिंग करणार आहे.

याचबरोबर रोहित शर्माने आपल्या संघात तीन वेगवान गोलंदाज घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग हे तीन वेगवान गोलंदाज आहेत. तर त्यांच्या जोडीला अष्टपैलू हार्दिक पांड्या देखील असणार आहे. याचबरोबर भारत रविंद्र जडेजा आणि युझवेंद्र चहल हे दोन फिरकीपटू घेऊन मैदानात उतरणार आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन :

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, इफ्तिकार अहमद, खुशदील शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारीस रौफ, शहानवाज दहानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT