Asia Cup 2022 sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : दुबईत आजपासून ‘क्रिकेट फेस्टिवल’; श्रीलंका-अफगाणिस्तान भिडणार

भारत-पाकिस्तान लढतींमुळे सर्व क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या आशिया कपला टी-20 स्पर्धेस आजपासून सुरुवात

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान लढतींमुळे सर्व क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या आशिया कपला टी-20 स्पर्धेस आजपासून सुरुवात होत आहे. ‘यजमान’ श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्या लढतीने स्पर्धेचे बिगूल वाजेल. टी-20 प्रकार असतो तेव्हा अफगाणिस्तान धोकादायक संघ म्हणून समजला जातो. त्यामुळे श्रीलंकेला सावधच रहावे लागणार आहे.

ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती; परंतु तेथे मोठी उलथापालथ झाल्यामुळे स्पर्धा अमिरातीत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठिकाण बदलले असले, तरी तांत्रिकदृष्ट्या श्रीलंकाच यजमान आहेत. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा ब गटात समावेश आहे. यातील दोनच संघ सुपर- फोरसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे या तिघांसाठी एकमेकांविरुद्धची प्रत्येक लढत महत्त्वाची आहे.

अफगाणिस्तानच्या तुलनेत श्रीलंकन संघ कागदावर जास्त समतोल दिसेल. संघात तरुण खेळाडूंचा समावेश जास्त आहे. कप्तान दसून शनाका स्वतः अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला चरित असालंका आणि धनंजय डिसिल्वाची साथ आहे. राजपाकसेसारखा आक्रमक फलंदाज आयपीएलचा अनुभव पाठीशी घेऊन येतो आहे.

अफगाणिस्तान संघाची ताकद टी-20 क्रिकेटचा ग्लोबल सुपरस्टार राशिद खानमध्ये दडली आहे. संघ वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीवर भरवसा ठेवेल. कारण राशिद खानच्या जोडीला मुजीब आणि अनुभवी मोहम्मद नबी असेल. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर चेंडूला हवा देणारे नाही, तर काहीसा वेगाने मारा करणारे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात, असा अंदाज आहे. आमच्या फिरकी गोलंदाजांना फलंदाजांनी साथ द्यायला हवी. नवे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट तोच प्रयत्न सरावात करत आहेत. आमचा संघ अगोदर झिम्बाब्वे आणि मग आयर्लंडचा दौरा करून आला असल्याने आमची चांगले टी--20 सामने खेळायची तयारी झाली आहे, असे नजीबुल्ला झद्रानने सांगितले.

सगळ्यांचे लक्ष फक्त भारत वि. पाकिस्तान लढतीकडे लागले असताना आम्ही विमान रडार खालून जाते तसा गपचूप सर्व करून तयार होत आहोत. आमच्या संघात गुणवान खेळाडू कमी नाहीत, असे श्रीलंकन संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड म्हणाले.

बांगलादेश आणि श्रीलंकापैकी किमान एका सामन्यात मोठी कामगिरी करून विजय मिळवता आला, तर पुढच्या फेरीत जाऊन भारत आणि पाकिस्तानसमोर दोन हात करायची संधी अफगाणिस्तानला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

‘एमआयडीसी‘तील बंद टॉवेल कारखान्यात वेश्याव्यवसाय! वॉचमन महिलेचा कारनामा, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील घटना, 2 पीडितांची सुटका; सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

Mor Kali Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी लाईट हवंय? बनवा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट 'मोर कली'!

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

SCROLL FOR NEXT