Asia Cup 2022 Sri Lanka Vs Pakistan CSK  ESAKAL
क्रीडा

Asia Cup 2022 : लंकेच्या विजयासाठी धोनीच्या CSK ने देखील लावला हातभार!

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 Sri Lanka Vs Pakistan : आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले. श्रीलंकेकडून भानुका राजापक्षे आणि वानिंदू हसरंगा यांनी संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. दरम्यान, सामना झाल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शानकाने श्रीलंकेच्या या दमदार कामगिरीचे थोडे श्रेय धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला देखील दिले. (MS Dhoni Chennai Super Kings Also Help Sri Lanka Captain Dasun Shanaka)

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी केली होती. 2021 चे आयपीएल टायटल चेन्नईने जिंकले होते. आता आशिया कपच्या फायनलनंतर दासुन शानका म्हणाला की, 'दुबईमध्ये झालेल्या आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत सामना जिंकला होता हे माझ्या डोक्यात होते. आम्ही याबाबत चर्चा देखील केली होती.' चेन्नईने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव केला होता. तर आशिया कपमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. चेन्नईच्या त्या सामन्यापासून श्रीलंकेने प्रेरणा घेतली.

आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले होते. त्यानंतर पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर गेला. मोहम्मद रिझवान आणि इफ्तिकार अहमदने सावध फलंदाजी करत डाव सावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोणत्याही गोलंदाजावर हल्ला चढवला नाही. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी 59 चेंडूत आली. मोहम्मद रिझवानने 49 चेंडूत 55 तर इफ्तिकारने 31 चेंडूत 32 धावा केल्या. या दोघांच्या संथ खेळीमुळे पाकिस्तानची धावगती मंदावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार

Crime News : मोफत पाणीपुरी देण्याची मागणी, नकार देताच चाकूने हल्ला; पाणीपुरी विक्रेत्याचा जागीच मृत्यू

Canada PR Without Job: कधी कॅनडात काम केले नाही? तरीही PR मिळू शकते; जाणून घ्या कसे

Education News: उच्च शिक्षणात क्रांती! परदेशी शिक्षणाचा खर्च वाचणार; भारतातच जागतिक विद्यापीठांचे वर्ग भरणार

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकी

SCROLL FOR NEXT