Asia Cup 2022 Sri Lanka Vs Pakistan Naseem Shah esakal
क्रीडा

Asia Cup 2022 SL vs PAK : फायनलच्या रंगीत तालमीत पाकिस्तानचा नवा हिरो नसीम बेंचवर

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 SL vs PAK : आशिया कपची फायनल श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. त्यापूर्वी सुपर 4 मधील श्रीलंका पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्याकडे फायनलची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने आपल्या संघात दोन बदल केले असून अफगाणिस्तान विरूद्धचा हिरो नसीम खानच्या जागी हसन अलीला संधी दिली आहे. (Asia Cup 2022 Sri Lanka Vs Pakistan Sri Lanka Won Toss Pakistan Rested Naseem Shah)

दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शानका आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या दोघांनीही संघातील बदल हे टी 20 वर्ल्डकपसाठीच्या कॉम्बिनेशनसाठी करण्यात आल्याचे सांगितले.

श्रीलंका वर्ल्डकपपूर्वी संघाची बेस्ट इलेव्हन कोणती असेल याची चाचपणी करणार आहे. त्यामुळे त्यांनी संघात धनंजया डिसिल्वा आणि प्रमोद मादूशान यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर पाकिस्तानने शादाब खान आणि नसीम शाह यांच्या जागी उस्मान कादिर आणि हसन अली यांना संधी दिली आहे.

पाकिस्तानचा अंतिम 11 चा संघ :

बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर झमान, इफ्तिकार अहमद, खुशदील शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हसन अली, हारिस रौऊफ, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.

श्रीलंकेचा अंतिम 11 चा संघ :

पथुम निसंका, कुसल मेंडीस, धनंजया डी सिल्वा, दनुष्का गुणतिलका, भानुका राजपक्षे, दसुन शानका, वानिंदू हसरंगा, चमिका करूणारत्ने, प्रमोद मदुशान, महीश तिक्षाणा, दिलशान मधुशंका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT