Asia Cup 2022 team india sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : रोहित अँड कंपनीची आधी 'फिटनेस टेस्ट' नंतर दुबईला रवाना

आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ या दिवशी दुबईला रवाना होणार आहे.

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 Team India : आशिया चषकची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींना आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तान सोबतचा हायहोल्टेज सामना 28 ऑगस्टला खेळल्या जाणार आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना त्याआधी फिटनेस टेस्ट करावी लागणार आहे. बीसीसीआयने 20 ऑगस्टला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये या फिटनेसचे आयोजन केले आहे. आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ 23 ऑगस्टला दुबईला रवाना होईल.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ 20 ऑगस्टला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मधील फिटनेस टेस्ट पुर्ण करतील. मग 23 ऑगस्टला टीम इंडिया दुबई साठी रवाना होणार आहे. भारतीय संघ आशिया चषक 2022 मध्ये आपला पहिला सामना आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 28 ऑगस्ट रोजी खेळणार आहे. दीपक हुड्डा आणि आवेश खान हे खेळाडू झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहेत, ते पण आशिया कप खेळणार आहेत.

आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत यूएई येथे होणार आहे. सुरुवातीला ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती, परंतु तेथील राजकिय परिस्थिती लक्षात घेता ही संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे.

भारतीय संघ -

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान

आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक

  • २७ ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • २८ ऑगस्ट- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • ३० ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • ३१ ऑगस्ट - भारत विरुद्ध क्वालिफायर, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • १ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • २ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • ३ सप्टेंबर - B1 विरुद्ध B2, Super 4, शाहजाह ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • ४ सप्टेंबर - A1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • ६ सप्टेंबर - A1 विरुद्ध B1, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • ७ सप्टेंबर - A2 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • ८ सप्टेंबर- A1 विरुद्ध B2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • ९ सप्टेंबर - B1 विरुद्ध A2, Super 4, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

  • ११ सप्टेंबर - अंतिम सामना, दुबई ( सायंकाळी ७.३० वाजल्यापसून)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT